युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काशी तमिळ संगमम मध्ये मैत्रीपूर्ण टेबल टेनिस सामन्याचे केले उद्घाटन


साहित्य, संस्कृती आणि क्रीडा यातून दोन संस्कृतीचा संगम: अनुराग ठाकूर

Posted On: 12 DEC 2022 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 डिसेंबर 2022

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘काशी तमिळ संगमम’ कार्यक्रमात साहित्य, संस्कृती आणि क्रीडा याद्वारे दोन संस्कृती एकत्र येत आहेत.  आठ दिवस चालणाऱ्या ‘काशी तमिळ संगमम - स्पोर्ट्स समिट’ चा भाग म्हणून आज आयोजित केलेल्या मैत्रीपूर्ण टेबल टेनिस सामन्याचे त्यांनी उद्घाटन केले.

अनुराग ठाकूर यांनी वाराणसीतील सिग्रा स्टेडियमच्या सुधारणांची पाहणी केली आणि झालेल्या कार्याचा आढावा घेतला.  त्यांनी स्टेडिअम सुधारणेचे काम अधिक उत्तम होण्यासाठी  कामात सुधारणा  सुचवल्या .  त्यांनी वाराणसीतील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध कार्यालयांचे जागेबाबत स्पेस ऑडिट देखील केले. त्यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘काशी तमिळ संगमम’ कार्यक्रमात साहित्य आणि संस्कृतीचे विविध कार्यक्रम होत आहेत आणि त्याचप्रमाणे खेळाच्या माध्यमातून उत्तर आणि दक्षिणेला जोडण्याचा उपक्रमही होत आहे.  ते म्हणाले की उत्तर आणि दक्षिण यांच्यातील संबंध हजारो वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या आपल्या प्राचीन परंपरा दर्शवतात.

ठाकूर यांनी काशी तामिळ संगममच्या पुढाकाराबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आणि या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून 'एक भारत श्रेष्ठ भारत' ही संकल्पना साकार होत असल्याचे सांगितले.  आज खेळाडूंमध्ये जो उत्साह दिसतो, तोच उत्साह उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूच्या सहभागी संघांच्या खेळाडूंमध्येही दिसतो, असेही ते म्हणाले.

ठाकूर यांनी असेही सांगितले की, तामिळनाडूच्या लोकांना ‘काशी विश्वनाथ’ ला भेट देण्याची संधी मिळते  त्याच बरोबर  येथील कला आणि संस्कृतीचीही ओळख त्यांना होत आहे, जी सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूतील सर्व खेळाडूंशी संवाद साधला.

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1882889) अभ्यागत कक्ष : 163