विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हवामान बदलामुळे हिंद महासागर, अरबी समुद्राच्या उत्तरेकडील क्षेत्र आणि मध्य बंगालच्या उपसागरात वादळी लाटांच्या दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता

Posted On: 09 DEC 2022 2:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2022

समुद्रातील मोठ्या प्रमाणातील लाटांच्या घटनांच्या अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की, हिंद महासागर, अरबी समुद्राच्या उत्तरेकडील क्षेत्र आणि मध्य बंगालच्या उपसागरात नजीकच्या भविष्यात वादळी लाटांच्या दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे जीवितावर आणि मालमत्तेवर, विशेषत: किनारपट्टीच्या भागात होणारे मोठे परिणाम टाळण्यासाठी वेळेवर इशारा आणि नियोजन करण्यासाठी या अभ्यासाची  मदत होऊ शकते.

बदलत्या हवामानानुसार, अलिकडच्या काळात तीव्र लाटा उसळण्याच्या घटना वारंवार नोंदवल्या गेल्या असून त्या किनारपट्टीवरील लोकसंख्येच्या उपजीविकेवर, पायाभूत सुविधांवर आणि समुद्राशी संबंधित उपक्रमांवर प्रचंड परिणाम करू शकतात. वादळाची तीव्रता आणि मार्ग बदलण्यासोबतच मोठ्या लाटा उसळण्यासंदर्भातली परिवर्तनशीलता आणि बदल हे  किनारपट्टीवरील बदल, जमिनीची धूप होण्याचे प्रमाण, पुराच्या घटना आणि किनारपट्टीवर निर्माण होणाऱ्या इतर संबंधित धोक्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. हवामान बदलामुळे निर्माण होणार्‍या तीव्र लाटा आणि त्याचे परिणाम प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर सतत होत आहेत. त्यामुळे, वेळेत इशारा देण्यासह किनारपट्टी नियोजन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने वारंवार उद्भवणाऱ्या प्रचंड अशा लाटा उसळण्याच्या घटनांसंदर्भातील भविष्यातील संभाव्य बदलांची चांगली समज असणे आवश्यक आहे

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, दिल्लीचा उपयोजित विज्ञान विभाग; भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर; आणि भारतीय सागरी माहिती सेवा राष्ट्रीय केंद्र , हैदराबाद मधील शास्त्रज्ञांच्या चमूने हिंद महासागरामधील मोठ्या लाटांच्या उंची निर्देशांकांच्या माध्यमातून भविष्यातील संभाव्य बदलांचा अंदाज वर्तवला आहे. त्यांचे हे संशोधन ‘क्लायमेट डायनॅमिक्स’ या नियतकालिकात  प्रकाशित झाले आहे. भविष्यातील लहरी हवामानात वर्तमानापेक्षा  मोठ्या प्रमाणात लक्षणीयरीत्या बदल घडू शकतात हे दर्शविण्यासाठी स्प्रिंगरने अलीकडेच COWCLIP2.0 डेटासेटचा वापर केला आहे.

आरसीपी 4.5 आणि 8.5 या दोन्ही परिस्थितींमध्ये दक्षिण हिंद महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात लाटा निर्माण होण्याच्या  दिवसांमधील बदल तीव्र होण्याचा अंदाज आहे,आणि लाटांच्या वेळी निर्माण होणाऱ्या वादळाचा कालावधी उत्तर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर, आग्नेय हिंद महासागर आणि दक्षिण हिंद महासागरावरआरसीपी  8.5  परिस्थितीत बळकट होत असल्याचे दिसून येते आहे.

R.Aghor/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1882075) Visitor Counter : 217


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil