युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

सर्वोत्तम खेळाडूंच्या उच्च कामगिरी संदर्भात उच्चस्तरीय संशोधन शिक्षण आणि अभिनवतेला पाठबळ देणे हेच राष्ट्रीय क्रीडा विज्ञान आणि संशोधन केंद्र योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे: अनुराग ठाकूर

Posted On: 08 DEC 2022 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2022

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा विज्ञान आणि संशोधन केंद्र (NCSSR) या योजनेचे उद्दिष्ट सर्वोत्तम  खेळाडूंच्या उच्च कामगिरी संदर्भात उच्च स्तरीय संशोधन शिक्षण आणि अभिनवता यांना पाठबळ  देणे आहे.  ही योजना भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI),ही  या मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आणि देशातील निवडक विद्यापीठे /संस्था/ वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत लागू केली जाते.

या योजनेंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (NCOE) आणि लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजना (TOPS) मधील खेळाडूंच्या वैद्यकीय सेवा आणि व्यवस्थापन तसेच दुखापतींचे पुनर्वसन याबाबत नियमित सल्लामसलत करण्यासाठी आणि प्रशिक्षण व्यवस्थापनासाठी डॉक्टर आणि वैज्ञानिक/ सहायक कर्मचार्‍यांना सामावून  घेतले जाते. यामध्ये मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील दुखापतींचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन यांचाही समावेश आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) खेळाडूंच्या दुखापतींच्या व्यवस्थापनासाठी सूचिबद्ध  रुग्णालयांच्या सेवांचा वापर करते.  भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे चे सर्व एनसीओई खेळाडूदेखील वैद्यकीय विम्याच्या अंतर्गत समाविष्ट आहेत, ज्याद्वारे खेळाडू रुग्णालयाच्या वैशिष्ठ्यानुसार  त्यांच्या आवडीच्या रुग्णालयातून वैद्यकीय सुविधा मिळवू शकतात.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

 

S.Kakade/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 1881925) Visitor Counter : 142


Read this release in: English , Urdu , Hindi