आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

वाराणसी येथे 10 डिसेंबर रोजी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज (UHC) अर्थात आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य प्रसार" दिवस 2022 साजरा होणार

Posted On: 08 DEC 2022 2:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2022

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय उत्तर प्रदेशातल्या वाराणसी, येथे 10 आणि 11 डिसेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य प्रसार दिवस 2022 निमित्ताने दोन दिवसांची परिषद आयोजित करत आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल, आनंदीबेन पटेल, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत या दोन दिवसीय  परिषदेचे  उद्घाटन करतील.  इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड कन्व्हेन्शन सेंटर रुद्राक्ष हॉल येथे हा कार्यक्रम होईल. .

युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज अर्थात आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य प्रसार"चे उद्दिष्ट  'सर्व लोकांना आवश्यक प्रोत्साहनात्मक, प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक आरोग्य सेवा मिळाव्यात, या सेवा अधिक प्रभावी होण्यासाठी त्या पुरेशा दर्जाच्या असाव्यात, तसेच या सेवांसाठी पैसे भरताना लोकांना आर्थिक त्रास होणार नाही याची खात्री करणे'.आहे. संयुक्त राष्ट्र संघाने वर्ष 2017 मध्ये अधिकृतपणे "12 डिसेंबर, हा दिवस,"आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज  दिवस" म्हणून साजरा केला होता. आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज  दिवसाची संकल्पना आहे, "आपल्याला हवे असलेले जग निर्माण करूयात: सर्वांसाठी एक आरोग्यदायी भविष्य", जी सर्वांसाठी आरोग्यदायी भविष्य निर्माण करण्यासाठी आरोग्य प्रसाराची भूमिका आणि महत्त्व अधोरेखित करते.

आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज (प्रसार) परिसंवादाचा एक  भाग म्हणून, यावर तीन मंत्रीस्तरीय सत्रे होतील:

1. आरोग्यासाठीप्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य सुविधा मोहिमेची अंमलबजावणी (PM-ABHIM) आणि 15 व्या वित्त आयोगाच्या (FC) अनुदानाची अंमलबजावणी

2. रोग निर्मूलन - (टीबी, काला आजार, लिम्फॅटिक फाइलेरियासिस, मलेरिया, कुष्ठरोग )

3. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) ची अंमलबजावणी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) कार्डचे वितरण.

डॉ. मनसुख मांडविया उद्घाटन समारंभात आयुष्मान भारत आरोग्य केंद्र AB-HWCs, मानसिक आरोग्य साठी टेलिफोनीक मदत आणि त्यासाठीची राज्यातली यंत्रणा सुविधा Tele Mental Health Assistance and Networking Across States (Tele-MANAS), आणि सार्वत्रिक आरोग्य अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण (CHOs) आणि  सशक्त (SASHAKT) पोर्टलसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रमासह  मार्गदर्शक तत्त्वे देखील सादर करतील. केंद्रीय आरोग्य मंत्री उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांचा/केंद्रशासित प्रदेशांचा सत्कारही करतील.

S.Kane/V.Yadav/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1881779) Visitor Counter : 122


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu