परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाखालची पहिली शेर्पा बैठक संपन्न

Posted On: 07 DEC 2022 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 डिसेंबर 2022

 

महत्वाकांक्षी उद्दिष्टावरील तीन दिवसांच्या भरीव चर्चेनंतर, आणि ऐतिहासिक कुंभलगड किल्ला आणि रणकपूर मंदिराच्या एका दिवसाच्या सहलीनंतर, भारताच्या अध्यक्षतेखालच्या जी-20 परिषदेमधील पहिली शेर्पा बैठक आज यशस्वीपणे संपन्न झाली. या बैठकीत जी-20 सदस्य, 9 अतिथी देश आणि 14 आंतरराष्ट्रीय संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला.  

भव्य अरवली टेकड्यांवर वसलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश असलेल्या भव्य कुंभलगड किल्ल्याच्या सहलीने जी-20 प्रतिनिधींना मंत्रमुग्ध केले.

त्यानंतर प्रतिनिधींनी 15 व्या शतकातील स्थापत्यकलेचा चमत्कार असलेल्या मघई नदीच्या काठावरच्या रणकपूर मंदिराला भेट दिली.

कृती-केंद्रित निर्णायक उद्दिष्टांवरील अर्थपूर्ण चर्चा आणि राजस्थानमधील विविध स्वादांचा अनोखा सांस्कृतिक अनुभव, याचा संयोग असलेल्या पहिल्या शेर्पा बैठकीने जी-20 मधील  कामकाजाच्या, शेर्पा ट्रॅक, फायनान्स ट्रॅक आणि एंगेजमेंट ग्रुप्स यासह विविध शाखांच्या आगामी 32 बैठकींसाठी सकारात्मक वातावरण निर्मिती केली आहे. सध्याच्या जागतिक आव्हानांवरील भरीव चर्चा आणि ‘अतिथी देवो भव’, या ब्रीदवाक्यासह झालेले स्नेहमय आदरातिथ्य, याचे सुरेल ध्वनी जी-20 शेर्पा बैठकीमधून उमटले.

    

    

   

   

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1881616)
Read this release in: English , Urdu , Hindi