रेल्वे मंत्रालय
वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेस
Posted On:
07 DEC 2022 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2022
भारतीय रेल्वेतर्फे, नवी दिल्लीतून 3 तर मुंबई सेन्ट्रल आणि चेन्नई सेन्ट्रल इथून प्रत्येकी एक अशा पाच वंदे भारत एक्सप्रेस वेगवेगळ्या पाच ठिकाणी ये- जा करतात. तर चेन्नई एग्मोर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लखनऊ आणि मुंबई सेन्ट्रल इथून प्रत्येकी एक अशा चार तेजस एक्सप्रेस वेगवेगळ्या चार ठिकाणी ये-जा करतात. 2022-23 या वर्षात (30 नोव्हेंबर 2022 पर्यंत) भारत गौरव ट्रेनच्या 26 व्यावसायिक फेऱ्या भारतीय रेल्वेने चालवल्या आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेस, ट्रेन जलद सेवा प्रदान करते. ऑनबोर्ड इन्फोटेनमेंट, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) आधारित प्रवासी माहिती प्रणाली, स्वयंचलित सरकते दरवाजे, मागे घेता येण्याजोगे फ़ूटस्टेप्स , झिरो डिस्चार्ज व्हॅक्यूम बायो टॉयलेट यासारख्या अत्याधुनिक अद्ययावत वैशिष्ट्यांनी ही रेल्वेगाडी सज्ज आहे.
तेजस एक्स्प्रेस सेवेचा उद्देश तेजस प्रकारचे डबे वापरून जलद सेवा प्रदान करणे हा आहे. स्वयंचलित प्रवेशद्वार, प्रवासी घोषणा/प्रवासी माहिती प्रणाली, आग आणि धूर झाल्यास तो दर्शवणारी यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे यासह तेजसचे डबे आधुनिक आहेत.
पर्यटन सर्किट ट्रेन्सच्या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणांचे भारतातील आणि जगातील लोकांना दर्शन घडवणे हे भारत गौरव ट्रेनचे उद्दिष्ट आहे.
भारत गौरव सेवा:
एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत भारत गौरव ट्रेन्सच्या 26 व्यावसायिक फेऱ्या भारत गौरव ट्रेन्स योजनेअंतर्गत चालवण्यात आल्या आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस या सेवांसह नवीन गाड्यांची ओळख कृती व्यवहार्यता, संसाधनांची उपलब्धता, रहदारीची पद्धत, स्पर्धात्मक मागणी इत्यादींवर अवलंबून आहे. ही भारतीय रेल्वेची सतत चालणारी प्रक्रिया आहे.
रेल्वे, दळणवळण तसेच इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1881520)