सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

वॉलमार्ट ग्लोबल सोर्सिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ लिमिटेड (एनएसआयसी) यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 07 DEC 2022 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 डिसेंबर 2022 

 

वॉलमार्ट ग्लोबल सोर्सिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ  लिमिटेड (एनएसआयसी) यांच्यात काल सामंजस्य करार झाला. एनएसआयसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौरांग दीक्षित तसेच वॉलमार्टच्या संचालक आणि केंद्र प्रमुख प्रमिला मल्लय्या यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या सामंजस्य कराराद्वारे विविध विकास कार्यक्रमात सहभागी होणार्‍या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना एनएसआयसीच्या योजना आणि इतर सेवांमध्ये एनएसआयसी सहभागी करून घेईल. शिवाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमईज) एनएसआयसीने प्रस्तावित केलेल्या विविध संधींअंतर्गत मोठ्या प्रमाणावर खेळते भांडवल, खरेदी समर्थन इ. मिळवण्याचे विविध फायदे मिळतील. एनएसआयसीच्या परिसंस्थेचा भाग असलेले सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग देखील संबंधित समूहातील विकास कार्यक्रमाशी जोडले जातील आणि त्यांना या कार्यक्रमांतर्गत विद्यमान व्यवसाय प्रशिक्षण सामग्री, सल्लागार समर्थन, साधने आणि ज्ञान विनामूल्य मिळेल . 2030 पर्यंत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर किमतीच्या  निर्यातीचा पल्ला गाठण्यासाठी  हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

“वॉलमार्टच्या वृद्धी कार्यक्रमामुळे मोठ्या संख्येने भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा विस्तार, त्यांचे उत्पादन वाढविण्याचा आणि वाढीचा  अनुभव घेता आला हे पाहून मला आनंद झाला. वॉलमार्टने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विशेषतः महामारीच्या काळात प्रशिक्षण दिले आणि त्यांच्यात क्षमता निर्माण करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतीय लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सध्या 6.3 कोटी उद्योगांचा समावेश आहे. त्यामुळे 11 कोटींहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. देशातील वाढत्या लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला वॉलमार्टच्या सतत पाठिंब्याची आम्ही अपेक्षा करतो.”असे नारायण राणे  कार्यक्रमादरम्यान म्हणाले.

गौरांग दीक्षित म्हणाले, “एनएसआयसी भारतातील मजबूत एमएसएमई क्षेत्राच्या वाढीसाठी आणि विकासासाठी वचनबद्ध आहे.या कार्यक्रमाअंतर्गत  एमएसएमईंना आमच्या योजनांमध्ये सामावून घेण्यासाठी आणि वृद्धीची शिक्षण संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वॉलमार्ट वृद्धी सोबत काम करण्यास उत्सुक आहोत. या भागीदारीद्वारे, देशभरातील एमएसएमईंना राष्ट्रीय आणि जगभरात व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य  मिळू शकते.”

 

* * *

N.Chitale/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1881489) Visitor Counter : 162


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu