आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्र सरकारच्या ई- संजीवनी या मोफत राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने 8 कोटींचा टप्पा केला पार
ई- संजीवनी सेवेने सुमारे 5 आठवड्यात 1 कोटी रूग्णांना टेलीमेडीसीन सल्ले देत मोडला विक्रम
Posted On:
06 DEC 2022 8:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2022
केंद्र सरकारच्या ई- संजीवनी या मोफत राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने 8 कोटींचा टप्पा पार करत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. यापैकी शेवटच्या एक कोटी सल्ले फक्त पाच आठवड्यात दिले गेले आहेत. हे या सेवेच्या वाढत्या वापराचे द्योतक आहे. ई- संजीवनी हा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा उपक्रम आहे. डिजिटल माध्यमातून पारंपरिक प्रत्यक्ष सल्ल्यांसाठी ही सेवा एक पर्याय आहे. तीन वर्षांहून कमी कालावधीत या उपक्रमाने जगातील सर्वात मोठी सरकारी टेली मेडिसीन सेवा होण्याचा मान मिळवला आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले अतिदुर्गम, अंतर्गत भागातलेही रूग्ण या सेवेचा यशस्वी लाभ घेऊ शकतात.
ई-संजीवनी आयुष्मान भारत- हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर (एचडब्लूसी) हे या सेवेचे एक माध्यम आहे. या केंद्रांद्वारे टेली सेवा देऊन ग्रामीण- शहर यातील डिजिटल आरोग्य विभाजन सांधण्याचा प्रयत्न केला जातो. आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना या सेवेचा लाभ घेता येईल याची ग्वाही दिली जाते. हे व्हर्टिकल माध्यम हब-आणि-स्पोक मॉडेलवर चालते. 'आयुष्मान भारत-आरोग्य आणि कल्याण केंद्रे' (एचडब्लूसी) राज्य स्तरावर उभारलेली आहेत. ही केंद्रे एमबीबीएस/विशेषता/सुपर- स्पेशालिटी डॉक्टर यांच्या विभागीय स्तरावरच्या हबशी संलग्नपणे कार्य करतात. ग्रामीण भागात राहणाऱ्या रुग्णाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने, हे मॉडेल 1,09,748 'आयुष्मान भारत-आरोग्य आणि कल्याण केंद्रे 'आणि 14,188 हबमध्ये यशस्वीरित्या लागू केले गेले आहे. त्याद्वारे एकूण 7,11,58,968 टेलिमेडिसीन सल्ले दिले गेले आहेत.
ई- संजीवनी बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी) हे दुसरे माध्यम आहे. यात ग्रामीण आणि शहरी भागातल्या नागरिकांना एकसमान सेवा पुरवली जाते. स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप द्वारे तंत्रज्ञानाचा लाभ घेत, ई संजीवनी सेवेद्वारे, रुग्णाचे निवासस्थान कुठेही असले तरी डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. ई- संजीवनी बाह्यरूग्ण विभाग सेवेने 2,22,026 तज्ञ, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांसह 1,144 ऑनलाई-न ओपीडी प्राप्त केल्या आहेत. या ओपीडीतल्या तज्ञ, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांना प्रशिक्षित केले गेले आहे. एका दिवसात 4.34 लाखांहून अधिक रुग्णांना सेवा देण्याचा विक्रम या सेवेच्या नावे जमा आहे. या ई- संजीवनी हा हा आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन (एबीडीएम) चा एकत्रित भाग आहे आणि ई- संजीवनी अर्जांद्वारे 45,000 हून अधिक आयुष्मान भारत खाती तयार केली आहेत. या सेवेचा वापर करणारी आघाडीची दहा राज्ये अशी: आंध्र प्रदेश (28242880), पश्चिम बंगाल (10005725), कर्नाटक (9446699), तामिळनाडू (8723333), महाराष्ट्र (4070430), उत्तर प्रदेश (3763092), मध्य प्रदेश (3283607), बिहार (2624482), तेलंगणा (2452529), गुजरात (1673888).
R.Aghor/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1881257)
Visitor Counter : 246