सांस्कृतिक मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘जगदीशचंद्र बोस–सत्याग्रही वैज्ञानिक’ यांच्या योगदानाविषयक आंतरराष्ट्रीय परिषद
Posted On:
03 DEC 2022 4:37PM by PIB Mumbai
सुप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आचार्य जगदीशचंद्र बोस यांची 164 वी जयंती आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून विज्ञान भारती आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘जगदीशचंद्र बोस– सत्याग्रही वैज्ञानिकाचे योगदान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. इंद्रप्रस्थ विज्ञान भारती आणि नवी दिल्लीतील आंतरविद्यापीठ त्वरक केंद्राच्या सहयोगाने ही परिषद झाली.
परिषदेचा भाग म्हणून दोन दिवसांत जवळपास 300 शालेय विद्यार्थ्यांनी ‘क्रेस्कोग्राफ’ यंत्राची जोडणी केली. वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी जगदीशचंद्र बोस यांनी ‘क्रेस्कोग्राफ’ या यंत्राची निर्मिती केली. या यंत्राचा एवढ्या मोठ्या संख्येने वापर करून पाहण्याचा हा देशातील पहिलाच प्रयत्न ठरला. तीन दूरदर्शकांचा वापर करून रात्रीचे आकाश पाहण्याच्या कार्यक्रमालाही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
आचार्य जगदीशचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात संशोधन करून विज्ञानात दिलेले योगदान आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन दिलेल्या योगदानाविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी, असा हेतू या परिषदेच्या आयोजनामागे होता. बोस यांनी बिनतारी रेडिओची निर्मिती केली व त्याबद्दल इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी संस्थेने त्यांचा ‘रेडिओ विज्ञानाचे जनक’ म्हणून गौरव केला. जैवभौतिकीपासून ते स्वातंत्र्यलढ्यातील बोस यांच्या नानाविध प्रकारच्या योगदानाविषयी आपण अनभिज्ञ आहोत.
***
S.Kane/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880669)
Visitor Counter : 240