महिला आणि बालविकास मंत्रालय
मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या 700 पेक्षा जास्त संभाव्य पालकांच्या संवादात्मक बैठका आणि 200 सोशल मिडिया विशेष मोहिमा तसेच 10 राज्य अभिमुखता कार्यक्रम काराने केले आयोजित
नोव्हेंबर 2022 मध्ये साजरा झाला ‘दत्तक जागरुकता महिना’
Posted On:
01 DEC 2022 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2022
‘दत्तक विधान जागरूकता महिना’ कार्यक्रमाचा चा भाग म्हणून, केंद्रीय दत्तक विधान प्राधिकरण, कारा (CARA) ने, नोव्हेंबर, 2022 मध्ये 10 राज्य अभिमुखता कार्यक्रम आयोजित केले, 200 विशेष सोशल मीडिया मोहिमा राबवल्या आणि मुल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या 700 पेक्षा जास्त संभाव्य पालक यांच्यासाठी संवादात्मक बैठका आयोजित केल्या. केंद्र सरकारने 23 सप्टेंबर 2022 रोजी अधिसूचित केलेल्या नवीन दत्तक विधान अधिनियम, 2022 च्या प्रमुख वैशिष्ट्यांची माहिती देखील त्यांना देण्यात आली.
कारा, दत्तक विधान प्रक्रियेशी जोडलेल्या समुदायाला याबाबतची सखोल माहिती देते आणि संबंधित कुटुंबाना साधन-सामुग्री उपलब्ध करते.
महाराष्ट्र, कर्नाटक, दमण आणि दीव, छत्तीसगड, केरळ, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये दत्तक जागरुकता महिना साजरा करण्यात आला.
दत्तक विधान जागरूकता महिना हा भागधारक आणि दत्तक घेण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबांमध्ये दत्तक विधान जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. दत्तक विधान प्रक्रियेद्वारे, कारा, मुलांचे दीर्घकालीन पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी समर्पित आहे.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1880401)