भारतीय निवडणूक आयोग

अंमली पदार्थांच्या मोठ्या प्रमाणातील जप्तीमधून गुजरात विधानसभा निवडणूक 2022 मध्ये खर्चावरची करडी देखरेख प्रतिबिंबित

Posted On: 30 NOV 2022 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2022

केंद्रीय  निवडणूक आयोगाने अनेक अंमलबजावणी संस्थाच्या माध्यमातून केलेले सूक्ष्म नियोजन, सर्वसमावेशक आढावा  आणि खर्चावरील देखरेख यामुळे गुजरात राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विक्रमी  जप्ती झाली आहे. वडोदरा (ग्रामीण) आणि वडोदरा शहरात एटीएस गुजरातच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करत अंमली पदार्थांची  मोठी खेप जप्त केली  आहे. या पथकाने  2-मेफेड्रोन ड्रग निर्मिती कारखान्यातून    सुमारे 478 कोटी रुपयांचे अंदाजे 143 किलो मेफेड्रोन  (सिंथेटिक ड्रग) उघडकीस आणले आहे. त्यांनी नडियाद आणि वडोदरा येथून 5 जणांना ताब्यात घेतले असून एनडीपीएस कायदा, 1985 च्या संबंधित कलमांतर्गत अहमदाबाद येथील एटीएस पोलिस ठाण्यात  फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई अद्याप सुरू आहे आणि ती पूर्ण झाल्यावर संपूर्ण तपशील उपलब्ध केला जाईल.

गुजरात राज्यात आत्तापर्यंत (29.11.2022 पर्यंत) झालेल्या जप्तीचा तपशील पुढीलप्रमाणे :

State

Cash

Liquor

Drugs

Precious metals

Freebies

Total Seizure

 

(Rs. Crore)

Quantity (Litres)

Value (Rs. Crore)

Value (Rs. Crore)

Value (Rs. Crore)

Value (Rs. Crore)

(Rs. Crore)

Gujarat

27.07

411851.23

14.88

61.96 (apart from the above-mentioned on-going drug seizure)

15.79

171.24

290.94

गुजरात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पैशाच्या शक्तीला  आळा घालण्याच्या उद्देशाने  प्रभावी देखरेखीसाठी, केंद्रीय  निवडणूक आयोगाने 69 व्यय  निरीक्षक देखील तैनात केले आहेत.

 

  

 

 

 

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1880120) Visitor Counter : 128


Read this release in: English , Urdu , Hindi