इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

इलेक्ट्रॉनिक्स आणि बीपीओ क्षेत्रात दोन वर्षात 1 कोटी अतिरिक्त रोजगार निर्माण होऊ शकतात: अश्विनी वैष्णव

Posted On: 30 NOV 2022 8:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2022

दूरसंवाद , इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, देशातील स्टार्ट-अप क्षेत्राची प्रगती लक्षात घेता येत्या दोन वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स आणि बिझनेस प्रोसेसिंग (बीपीओ) क्षेत्रात 1 कोटी अतिरिक्त रोजगार  निर्माण होऊ शकतात.

भारतीय सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क  आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर निर्यात प्रोत्साहन परिषदेने  आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्टार्ट-अप उपक्रमाचे  उद्घाटन करताना ते म्हणाले की, केवळ इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र 25 ते 3O लाखांदरम्यान अतिरिक्त रोजगार निर्माण करू शकते आणि बीपीओ क्षेत्र येत्या दोन वर्षांत 80 लाख रोजगार उपलब्ध करून देऊ शकेल,ज्यामुळे  सध्याच्या रोजगाराच्या पातळीत लक्षणीय वाढ होईल.

त्यांनी सांगितले की, उत्पादन क्षेत्रात  नवनवीन संशोधन मोठ्या प्रमाणावर होत आहे , विशेषत: मोबाईल टेलिफोन प्रणालीत  भारत काही वर्षांपूर्वी निव्वळ आयातदार होता , तो  आता एक प्रमुख निर्यातदार बनला आहे.

विविधता हा आणखी एक पैलू असल्याचे त्यांनी नमूद केले. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील  शहरांना डिजिटल पद्धतीने जोडून हे साध्य केले जाते जेणेकरून विकासाची गती  वाढवण्यासाठी या शहरांमधून उद्योजक घडवता येतील.  कार्यान्वित केलेल्या 64 डिजिटल हबपैकी 54 लहान  शहरांमध्ये आहेत, ज्याचा देशातील स्टार्ट-अपच्या प्रसारावर उल्लेखनीय प्रभाव पडेल.

तत्पूर्वी, प्रतिनिधींचे स्वागत करताना, ईएससीचे अध्यक्ष संदीप नरुला यांनी ESC-STPI स्टार्ट-अप उपक्रमाचे कारण स्पष्ट केले. आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश , राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, नवी दिल्ली आणि ओडिशा या राज्यांमध्ये 13 हून अधिक राज्य परिषदांचे आयोजन  करण्यात आले होते.

 

 N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1880099) Visitor Counter : 123


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil