प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार

डन अ‍ॅन्ड ब्रॅडस्ट्रीट बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड्स 2022मध्ये मंथन या मंचाने सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान उपक्रमशीलता पुरस्कार पटकाविला

Posted On: 30 NOV 2022 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2022

केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांचे कार्यालय आणि राष्ट्रीय शेअर बाजाराची माहिती तंत्रज्ञान कंपनी (एनएसइआयटी) यांच्या सहकार्यातून विकसित झालेल्या मंथन या मंचाला डन ॲण्ड ब्रॅडस्ट्रीट बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड्स 2022चा सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान उपक्रमशीलता पुरस्कार मिळाला आहे. मुंबईत काल हा पुरस्कार वितरण समारंभ झाला. केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या कार्यालयाच्या धोरणात्मक सहकार्य विभागाच्या संचालक डॉ. सपना पोटी आणि एनएसइआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक अनंथरामन श्रीनिवासन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

उद्योग जगत  आणि वैज्ञानिक संशोधन आणि विकास प्रणाली यांच्यामध्ये सहयोग वाढवण्याचा मंथनचा उद्देश आहे. देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनी केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय के सूद यांनी मंथन या मंचाचे उद्घाटन केले. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी आणि आपल्या राष्ट्रीय वैज्ञानिक मोहिमांशी संलग्न उपाययोजनांसाठी अनेक संबंधित यंत्रणांना अधिक सक्षम करणे हे यासाठी हा मंच सुरू करण्यात आला आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण प्रणाली या क्षेत्रातील संबंधितांच्या भागीदारीतून योग्य ती फलनिष्पत्ती होण्यासाठी हा मंच महत्त्वाचा आहे. असे मत सूद यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रीय स्थूल उत्पादनाच्या (जीडीपीच्या) दृष्टीने उद्योगांचा सहभाग सुधारण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मंथनमुळे चालना मिळेल. गेल्या काही वर्षांमध्ये, शैक्षणिक आणि उद्योग ही दोन क्षेत्रे दोन्ही बाजूंच्या समस्या किंवा आव्हाने सोडवण्यासाठी एकत्र आली तेव्हा ही भागीदारी उत्साहवर्धक ठरल्याचे सूद म्हणाले.

डन आणि ब्रॅडस्ट्रीट बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड्स 2022:

जगभरातील कंपन्यांना बीटूबी डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित  व्यासपीठे उपलब्ध करून देणारी डन अ‍ॅन्ड ब्रॅडस्ट्रीट ही जागतिक संस्था आहे. 1841 पासून जोखीम व्यवस्थापन आणि संधी उपलब्धतता यासाठी लहान-मोठ्या कंपन्या  डन अ‍ॅन्ड ब्रॅडस्ट्रीट वर विसंबून आहेत. डन अँड ब्रॅडस्ट्रीट एसएमई (लघु, मध्यम उद्योग) आणि मिड-कॉर्पोरेट ‘बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड्स 2022’ हा लघु, मध्यम उद्योग आणि मिड-कॉर्पोरेट्सच्या कामगिरीची दखल घेण्याचा प्रयत्न आहे. या पुरस्कारांमध्ये मुख्यतः व्यवसाय कामगिरीच्या मापदंडांवर आधारित 23 श्रेणींचा समावेश आहे. बँकिंग आणि ऊर्जा विकास क्षेत्रातील तज्ञ असलेल्या प्रतिष्ठित ज्युरी पॅनेलद्वारे पुरस्कार नामांकनांचा आढावा घेतला जातो.

एनएसइआयटी बद्दल:

एनएसइआयटी लिमिटेड ही एक जटिल डिजिटल वातावरणात, प्रामुख्याने बँकिंग, विमा आणि भांडवली बाजार परिसंस्थांचा दर्जा उत्कृष्टता करण्यावर भर  देणारा जागतिक तंत्रज्ञान आस्थापना आणि राष्ट्रीय शेअर बाजाराची उपकंपनी आहे. अॅप्लिकेशन आधुनिकीकरण, व्यवसाय स्थितंत्यरे, डेटा अॅनालिटिक्स, पायाभूत सुविधा आणि क्लाउड सर्व्हिसेस, सायबर सुरक्षा, शिक्षण तंत्रज्ञान  आणि ऑनलाइन परीक्षांसंदर्भात  निराकरण या प्रमुख सेवा ही कंपनी पुरविते.

अधिक माहितीसाठी  www.nseit.com. या संकेतस्थळाला भेट द्या

 

 

N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 1880055) Visitor Counter : 200


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu