आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

41 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2022 मध्ये आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक संपर्क आणि प्रसारासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठीचा  पुरस्कार पटकावला


या शिबिरांमधून 37,000 हून अधिक चाचण्या, समुपदेशन आणि प्रशिक्षणाचे आयोजन

Posted On: 28 NOV 2022 3:53PM by PIB Mumbai

 

प्रगती मैदानावर आयोजित 41व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पॅव्हेलियनला (मंडपाला) "सार्वजनिक संपर्क आणि प्रसारासाठीच्या उत्कृष्ट योगदानासाठी" काल गौरवण्यात आले. 14 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झालेल्या पंधरवड्यामध्ये दररोज मोठ्या संख्येने येणा-या व्यापार मेळाव्यात हेल्थ पॅव्हेलियन सर्वात लोकप्रिय पॅव्हेलियन पैकी एक होता.

हेल्थ पॅव्हेलियन हा विविध चाचण्यांचे केंद्र होते, विविध सार्वजनिक आरोग्य समस्यांवर समुपदेशन करणे, तसेच तज्ञांद्वारे जीवनरक्षक कौशल्ये प्रदान करणे आदी सेवा मुख्य ठिकाणी असलेल्या आणि प्रगती मैदानावर तीन बाजूला असलेल्या या शिबिरांमधून देण्यात आल्या.   या पॅव्हेलियनमध्ये तब्बल 37,887 चाचण्या, विविध तपासण्या, समुपदेशन आणि प्रशिक्षण देण्यात आले.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या या पॅव्हेलियनने यशस्वीरित्या प्रेक्षकांना आकर्षित केले आणि क्षयरोग, तंबाखू सेवन टाळणे, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांवर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करून माहिती प्रसारित केली. दैनंदिन नुक्कड नाटकांमधून क्षयरोगापासून बचाव, एचआयव्ही/एड्स बद्दल जागरूकता आणि त्याविषयक  गैरसमज दूर करणे, क्षयरोगाच्या चाचणी आणि उपचारांसाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ  कसा मिळवावा, आणि  भेटी देणाऱ्या अभ्यागतांना अवयव दानासाठी प्रेरित करणे  अशा अनेक विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. पॅव्हेलियनमध्ये जादूच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी प्रदुषण, सकस आहार, निरोगी जीवनशैली इ. यांसारख्या नव्याने निर्माण झालेल्या समस्यांवर जागरूकता आणण्यासाठी रेखाचित्र आणि प्रश्नमंजुषा आयोजित केल्या होत्या.

या पुरस्कार विजेत्या पॅव्हेलियनचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे तज्ञ, प्रख्यात डॉक्टर आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींसोबतचे "थेट आणि मार्गदर्शक संभाषण".  यामधून त्यांनी वायू प्रदूषण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम, निरोगी जीवनशैली अंगीकारणे, अवयव दान, आरोग्य सेवा प्रणालीमध्ये परिचारिकांची भूमिका, उपशामक काळजी, असंसर्गजन्य रोग, रोबोटिक्स शस्त्रक्रिया आणि त्याचे फायदे, कुष्ठरोग आणि दंतचिकित्सा आदी मुद्द्यांवर त्यांचे दृष्टिकोन मांडले.

Image

पद्मश्री आणि खेलरत्न पुरस्कार विजेती डॉ. दीपा मलिक यांनी मंडपाला भेट दिली आणि निक्षय मित्र म्हणून सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879620) Visitor Counter : 122


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi