माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ चित्रपटातून दिग्दर्शक व्हॅलेंटीना मॉरेल यांनी कौटुंबिक नातेसंबंधांची गुंतागुंत आणि किशोरवयीनाचा प्रौढावस्थेकडेचा प्रवास उलगडून दाखवला आहे
हा चित्रपट नातेसंबंधांमधील गुंतागुंत आदर्श मानत नाही किंवा तिचा निषेधही करत नाही: निकोलस वोंग
गोवा/मुंबई, 27 नोव्हेंबर 2022
"हा चित्रपट प्रौढावस्थेकडील आयुष्याचा प्रवास उलगडतो , जी केवळ वय वाढण्याची एक प्रक्रिया नाही. ही एक अशी गहन प्रक्रिया आहे जी काहीवेळा त्या लोकांना एका विशिष्ट प्रकारे कमकुवत करू शकते.
या चित्रपटाची कथा नुसती वयात येणाऱ्या मुलांची कथा नाही तर त्यापेक्षाही अधिक गुंतागुंतीची आहे असं 'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' या चित्रपटाचे छायाचित्रकार निकोलस वोंग यांनी गोवा इथे 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज 'IFFI टेबल टॉक्स' सत्राला संबोधित करताना सांगितलं.
या चित्रपटात आधुनिक काळातील कोस्टा-रिका संस्कृती आणि प्रौढत्वाच्या अडचणींचे चित्रण असल्याचे सांगत निकोलस म्हणाले की हा चित्रपट लोकांना जगाच्या दुसऱ्या बाजूने कथेकडे पाहण्यात आणि त्याच वेळी कौटुंबिक मूल्ये किंवा वैश्विक भावनांशी जोडण्यास मदत करू शकतो.
ईवा या प्रमुख पात्राची कथा सांगताना, निकोलस यांनी नमूद केले की दिग्दर्शक व्हॅलेंटिना मॉरेल यांनी नैतिक निर्णयावर भर न देता आयुष्याच्या गुंतागुंतीचे प्रामाणिक चित्र सादर करण्याचा प्रयत्न केला आहे . "नैतिक निर्णय न देता , दिग्दर्शक या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अशा गुंतागुंतीच्या नातेसंबंधांमध्ये त्यांचे स्वतःचे स्थान तपासण्याचा प्रयत्न करायला लावतो " असे निकोलस वोंग म्हणाले.
हा चित्रपट तरुण पिढीसाठी कोणता संदेश देईल याबाबत विचारले असता निकोलस म्हणाले की हा चित्रपट प्रेमाच्या विविध छटा आणि वाढत्या वयाच्या गुंतागुंतीचे पैलू उलगडून दाखवतो. तुम्हाला आवडत असलेल्या लोकांच्या क्षमतेतील तफावत हाताळण्याची आणखी एक महत्त्वपूर्ण संकल्पना या चित्रपटात आहे. 'इवा' या नायिकेची मध्यवर्ती भूमिका करणारी 19 वर्षीय नवोदित अभिनेत्री डॅनिएला मारिन नवारोच्या कास्टिंगबाबत निकोलसने सांगितले की पटकथा आणि पात्राची तिला खूप खोलवर समज आहे. 'हे तिच्याबरोबर नैसर्गिकरित्या होते. ती खूप शांत आणि हुशार होती " असे त्यांनी सांगितले.
आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स मधील दृश्य
सारांश:
ईवा ही 16 वर्षांची प्रबळ इच्छाशक्ती असलेली मुलगी आहे, जी तिची आई, तिची धाकटी बहीण आणि त्यांच्या मांजरीसोबत राहते, परंतु तिला तिच्या पासून दूर गेलेल्या वडिलांसोबत जायचे आहे. पौगंडावस्थेतून जात असताना ती किशोरवयीन जीवनातील कोमलता आणि संवेदनशीलता आणि प्रौढ जगाची निर्दयता यामध्ये समतोल साधते. अशा जगात जिथे आक्रमकता आणि क्रोध स्त्री लैंगिक प्रबोधनाच्या जाणिवेत गुंफले असताना ' आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ प्रेम आणि द्वेष यामधील पुसटशी रेषा अचूक पकडतो.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879417)
Visitor Counter : 221