माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'गुरुजन' ही 15 व्या –16व्या शतकातील आसामी विद्वान संत श्रीमंत शंकरदेव यांना संगीतमय मानवंदना आहे


शंकरदेव यांचा संदेश केवळ भारतातच नाही तर जगभरात पोहोचवणे गरजेचं आहे असे मला वाटले : दिग्दर्शक सुदीप्तो सेन

इफ्फी 53 मध्ये भारतीय पॅनोरमा विभाग अंतर्गत गुरुजन हा नॉन-फिचर चित्रपट दाखवण्यात आला

गोवा/मुंबई, 27 नोव्‍हेंबर 2022

 

'गुरुजन' ही 15 व्या –16व्या शतकातील आसामी विद्वान श्रीमंत शंकरदेव यांना संगीतमय मानवंदना आहे.

शंकरदेव यांना आसाम आणि ईशान्य भारतातील इतर भागातले लोक 'गुरुजन'  असे म्हणतात”, असे दिग्दर्शक  सुदिप्तो सेन म्हणाले . ते आज गोव्यात इफ्फी  53 मध्ये पत्र सूचना कार्यालयाने माध्यम  तसंच महोत्सवासाठी आलेल्या  प्रतिनिधींसाठी आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात  बोलत होते.

सुदीप्तो सेन पुढे म्हणाले की, शंकरदेव केवळ भक्तीमार्गी संत म्हणून नव्हे तर एक असामान्य  लेखक आणि संगीतकार म्हणूनही उदयाला  आले. ब्रजवली नावाची नवीन साहित्यिक भाषा तयार करण्यातही त्यांनी मदत केली होती. 

गोवा इथे 53 व्या इफ्फीमध्ये  'IFFI टेबल टॉक' मध्ये दिग्दर्शक सुदीप्तो सेन

आपल्या देशाने युरोपियन क्रांतीच्याही  काही शतके आधी ‘भक्ती’ चळवळीच्या रूपात सुधारणावादी पुनरुत्थान पाहिले होते याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही, असं आपल्याला जाणवल्याचं मत या प्रख्यात चित्रपट निर्मात्यांनी व्यक्त केलं.

'गुरुजन' बनवण्यामागील प्रेरणा याबाबत  सुदीप्तो सेन म्हणाले, “शंकरदेव यांचा संदेश केवळ भारतातच नाही तर जगभरात पोहोचवणे गरजेचं आहे असे मला वाटले. या नॉन फीचर चित्रपटाद्वारे मी त्यांना संगीतमय मानवंदना दिली आहे.”

 

नॉन फीचर चित्रपट 'गुरुजन' चे पोस्टर

गोव्यात सुरू असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इंडियन पॅनोरमा विभाग अंतर्गत  गुरुजन  दाखवण्यात आला.

 

सारांश:

15व्या -16व्या शतकातील वैष्णव संत, श्रीमंत शंकरदेव हे एक धार्मिक नेते आणि उत्कृष्ट  समाजसुधारक होते. जातिव्यवस्था आणि कठोर धार्मिक प्रथा यांच्या जोखडातून समाजाला मुक्त करण्यासाठी त्यांनी अथक संघर्ष केला.

स्वभावाने  पुरोगामी द्रष्टे असलेल्या  त्यांना भारतवर्षात समतावादी समाज घडवायचा होता. त्यांचे अनुयायी त्यांना ज्या नावाने ओळखतात त्या गुरुजन नावाचा हा चित्रपट  संगीतमय पद्धतीने प्रस्तुत केला असून  भगवान विष्णूचा पुनर्जन्म म्हणून संबोधित केले जाणाऱ्या या  हा महापुरुषाला जाणून घेण्याचा हा  एक अनोखा अनुभव आहे.

 

चित्रपटाबद्दल :

दिग्दर्शक: सुदीप्तो सेन

निर्माता:इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स

पटकथा: सुदीप्तो सेन, रिया मुखर्जी

छायाचित्रण : आशिष कुमार, शोभिक मल्लिक

संकलक: हिमाद्री शेखर भट्टाचार्य

2022 | इंग्रजी | रंगीत  | 50 मि

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1879406) आगंतुक पटल : 246
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , Urdu , Tamil , English