माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

दादागिरी विरोधात उभे राहणाऱ्या क्लिंटनने इफ्फी -53 मध्ये सर्वांची मनं जिंकली


"बाल चित्रपट पाहणे मुलांइतकेच प्रौढांसाठीही महत्वाचे" - क्लिंटनचे दिग्दर्शक पृथ्वीराज दास गुप्ता

गोवा/मुंबई, 27 नोव्‍हेंबर 2022

 

“मला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्याबद्दल पूर्वी माझ्या पालकांवर मी नाराज असायचो, मात्र  आता मी त्यांचा आभारी आहे कारण त्यामुळे मला माझा चित्रपट बनवताना  मदत झाली”, असे दिग्दर्शक पृथ्वीराज दास गुप्ता यांनी 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या  'इफ्फी टेबल टॉक्स' सत्रात संवाद साधताना सांगितले.

त्यांचा क्लिंटन हा चित्रपट पश्चिम बंगालच्या कालिम्पॉंग येथील बोर्डिंग स्कूलमधील त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवरून प्रेरित आहे.

शाळेतल्या दादागिरीचा सामना करताना 10 वर्षांच्या क्लिंटनने दाखवलेल्या दयाळूपणा आणि धैर्याविषयी हा चित्रपट असून , मुले जगाकडे कसे पाहतात आणि त्याला कसा प्रतिसाद देतात याचा हा धडा आहे. क्लिंटन हा इंग्रजी भाषेतील नॉन-फिचर  चित्रपट आहे जो इफ्फी  53 मधील भारतीय पॅनोरमा विभागाचा भाग आहे.

दिग्दर्शक पृथ्वीराज दास गुप्ता पुढे म्हणाले, "केवळ मीच ही कथा सांगू शकलो असतो, कारण ते मी प्रत्यक्ष जगलो  आहे आणि मी या कथेला तो खरेपणा देऊ शकलो असतो." इफ्फी मधला या  दिग्दर्शकाचा हा दुसरा चित्रपट आहे, त्यांचा  पहिला चित्रपट देखील यापूर्वी इफ्फी मध्ये प्रदर्शित झाला होता.

हा चित्रपट केवळ शाळांमध्येच नाही तर अशा ठिकाणी देखील  प्रदर्शित केला जाईल  जिथे प्रौढ प्रेक्षक देखील तो पाहू शकतील अशी आशा त्यांना वाटत होती, याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, हा चित्रपट तसेच  इतर बालचित्रपट देखील प्रौढांनी पाहणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांना मुले कशी वागतात हे समजेल.  ते पुढे म्हणाले, "अनेकदा प्रौढ लोक मुलांच्या समस्या फेटाळून लावतात, त्यांना समजत नाही की छोट्या-छोट्या  गोष्टी मुलांसाठी किती महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा मुलांवर  काय परिणाम होतो." क्लिंटन चित्रपटातून मुलांची निरागसता पडद्यावर साकारता येईल आणि कालिम्पॉंग येथील बोर्डिंग स्कूलमधील बालपणाची देखील आठवण करून देईल अशी त्यांना आशा आहे.


* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1879355) Visitor Counter : 197