माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मेक्सिकन सिनेमाच्या मेजवानीने इफ्फी-53 प्रतिनिधी आनंदित


“अतुल्य भारताच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मेक्सिकन चित्रपट सहभागी झाल्याचा आम्हाला अभिमान आहे”: मेक्सिकोचे पर्यटन मंत्री मिगुएल टोरुको माकुस

Posted On: 27 NOV 2022 3:45PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 27 नोव्‍हेंबर 2022

 

53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने आपल्या सर्व प्रतिनिधींसाठी एक आकर्षक मेक्सिकन मेजवानी तयार केली आहे. या महोत्सवात विविध श्रेणींमध्ये मेक्सिकोचे अनेक चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत. मेक्सिकोचे पर्यटन मंत्री मिगुएल टोरुको माकुस यांनी एका व्हिडिओ संदेशात आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “गोव्यातील 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा अत्यंत महत्त्वाचा क्षण तुमच्यासोबत शेअर करणे हा माझा सन्मान आहे. मेक्सिको त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि विविधतेसाठी ओळखला जातो. आणि आमचा सिनेमा या वारशाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आमच्या देशात अनेक महान चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते  आहेत, ज्यांना दिग्गज मानले जाते. जगभरात आमच्या चित्रपटांना  अनेक पुरस्कार मिळाले आहेत."

देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाची अभिव्यक्ती म्हणून मेक्सिकन सिनेमाचा जन्म झाल्याचे त्यांनी नमूद  केले.

‘इफ्फी टेबल टॉक’ सत्रादरम्यान, रेड शूज चित्रपटाचे निर्माते अलेजांद्रो डी इकाझा म्हणाले, “मेक्सिकन सरकारने सिनेमासाठी विशेष निधी राखून ठेवला आहे , ज्या अंतर्गत ते आमच्यासारख्या दर्जेदार  चित्रपटांना प्रोत्साहन देतात.  सरकारी प्रोत्साहनाशिवाय अशा प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती करणे कठीण आहे कारण  व्यावसायिकदृष्ट्या ते परवडत नाही. ” ते पुढे म्हणाले की विवाह सोहळा या संकल्पनेवर भारताबरोबर संयुक्तपणे चित्रपट निर्मिती करण्याचा ते विचार करत आहेत .

“आम्ही खरे तर विवाह सोहळा या संकल्पनेवर  संयुक्तपणे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन्ही देशांमधले विवाहसोहळे भव्य आणि  रंगतदार असतात आणि ते बरेच दिवस चालतात. या प्रकारच्या सांस्कृतिक समानतेमुळे भविष्यात आणखीही प्रकल्प गती घेऊ  शकतात.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Picture14DXN.jpg

मेक्सिकन चित्रपट 'रेड शूज' मधील दृश्य

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Picture3PNOF.jpg

मेक्सिकन चित्रपट 'आयलँड ऑफ लॉस्ट गर्ल्स' मधील दृश्य

मंटो डी गेमास (रोब ऑफ जेम्स), हा चित्रपट मेक्सिको आणि अर्जेंटिना यांची सह-निर्मिती असून , फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप श्रेणी अंतर्गत प्रदर्शित करण्यात आला.  या  चित्रपटाला मेक्सिकोच्या ग्रामीण भागाची पार्श्वभूमी आहे, जिथे वेगवेगळ्या सामाजिक वर्गातील तीन स्त्रिया संघटित गुन्हेगारीशी संबंधित बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणात दुःखदपणे सामील होतात. इफ्फी 53 मध्ये आपले अस्तित्व जाणवून देणारे इतर मेक्सिकन  चित्रपट ब्लँकिटा , सोल्स जर्नी ,  इआमी , पिनोकियो  आणि हुसेरा हे आहेत.

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879338) Visitor Counter : 161