माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

मला प्रेक्षकांनी माझ्या चित्रपटीय विश्वाचा भाग होणे अपेक्षित आहे:फिलिपाईन्सचे दिग्दर्शक लव डियाझ यांचे मत


दोन ते अडीच तासांत संपणाऱ्या चित्रपटांची संकल्पना भांडवलवादाने लादली आहे

‘चित्रपटांचे संकलन करणे ही लयबद्ध प्रक्रिया आहे”

गोवा/मुंबई, 26 नोव्‍हेंबर 2022

 

गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय पॅनोरमा विभागात फिलिपाईन्सचे दिग्दर्शक लव डियाझ यांचा  ‘व्हेन द वेव्हज आर गॉन’ हा चित्रपट सुवर्ण मयूर पुरस्कार मिळविण्यासाठीच्या स्पर्धेत आहे.  बदला आणि हिंसेच्या चिरडून टाकणाऱ्या चक्रांची गडद आणि प्रदीर्घ कथा असलेल्या या चित्रपटाचा प्रीमियर व्हेनिस चित्रपट महोत्सव 2022 मध्ये सादर झाला.16 मिलिमीटरच्या फिल्मवर कृष्णधवल चित्रपट  पोलिसांनी समाजाच्या स्वच्छतेच्या नावाखाली प्रोत्साहन दिलेल्या आणि अनेक बेकायदेशीर हत्यांना जबाबदार ठरलेल्या अंमली पदार्थ तस्करांच्या युद्धाचे दर्शन घडवतो. 53 व्या इफ्फीमध्ये पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या संभाषणात्मक कार्यक्रमात प्रसार माध्यमे तसेच महोत्सव आयोजकांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधताना चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ‘फिलिपिनो मास्टर ऑफ स्लो सिनेमा’ म्हणून लोकप्रिय असलेले लव डियाझ म्हणाले की त्यांना त्यांचे प्रेक्षक चित्रपटीय विश्वाचा भाग होणे अपेक्षित आहे.

या चित्रपटाविषयी अधिक तपशीलवार माहिती देताना ते म्हणाले की, ते त्यांच्या प्रेक्षकांना स्वतःला पाहिजे तसे जायला भाग पाडत नाहीत आणि त्यांना केवळ निरीक्षकाची भूमिका घेणे आवडते. “माझ्या चित्रपटाचे प्रेक्षक पडदाआणि दर्शक यांच्यातील विभागणी अमान्य करतात. ये त्या चित्रपटाचा भाग असतात.लांबून घेलेले शॉट्स आणि लांबलचक कालावधी यामुळे चित्रपटात तल्लीन होण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

लव डियाझ यांनी हॉलीवूडच्या चित्रपटांमधून दिसणाऱ्या दृष्टिकोनावर टीका करून, ते म्हणाले की अशा चित्रपटांमध्ये प्रमुख पात्राला सर्वोच्च स्थान दिलेले असते. “हे चित्रपट शेवटपर्यंत मुख्य पात्राच्या हालचालीनुसार पुढे सरकतात.माझ्या चित्रपटांमध्ये तुम्हांला झाडे, पक्षी आणि लोक जीवनाच्या सर्व पद्धतीच्या प्रकटीकरणातून व्यक्त होतात,” ते म्हणाले.

लव डियाझ यांचे चित्रपट त्यांच्या दीर्घ कालावधीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा ‘एव्होल्युशन ऑफ अ फिलिपिनो फॅमिली हा चित्रपट 11 तासांचा होता तर ‘वूमन हु लेफ्ट’ हा चित्रपट 3 तास 48 मिनिटांचा होता. इफ्फी मध्ये काल सादर झालेला ‘व्हेन द वेव्हज आर गॉन’ हा चित्रपट 3 तास 7 मिनिटांचा होता. चित्रपटासाठी दीर्घ पाटलाची निवड करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना लव डियाझ म्हणाले की  दोन ते अडीच तासांत संपणाऱ्या चित्रपटांची संकल्पना भांडवलवादाने लादली आहे ते पुढे म्हणाले, की त्यांच्यासाठी चित्रपट म्हणजे अभिव्यक्तीचे मुक्त स्वरूप आहे.

“माझ्यासाठी चित्रपट म्हणजे अधिकांश प्रमाणात सांस्कृतिक घडामोड आणि कलेचा अविष्कार आहे. मला स्वतःला व्यक्त व्हायचे असते. मला माझ्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करायचे असते. माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून मला जीवनाचे परिक्षण करायचे असते. मला जसा हवा तशा पद्धतीने चित्रपट तयार करायला मला आवडतो,” त्यांनी स्पष्ट केले.

या चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेचा मागोवा घेताना, लव डियाझ म्हणाले की ‘व्हेन द वेव्हज आर गॉन’ हा चित्रपट सात वर्षांपूर्वी गुंडांच्या संबंधीचा चित्रपट म्हणून सुरु करण्यात आला. “योग्य अभिनेते शोध्ण्यातील अपयश आणि निधीची चणचण यामुळे चित्रपट पूर्ण होण्यास उशीर झाला.” ते पुढे म्हणाले की, फिलिपाईन्समध्ये अंमली पदार्थाच्या कारणाने होणाऱ्या चकमकींमध्ये मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या बाबतीत झालेल्या प्रतिक्रिया बघता  त्यांनी तीन वर्षांपूर्वी अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटाचा प्रस्ताव सादर केला.

म्हणून, दीर्घ काळाचा विचार करता, एखाद्याला असे वाटेल की लव डियाझ खरोखरीच त्यांच्या चित्रपटांसाठी संकलकाच्या संस्कारांचा विचार करतात का? या प्रश्नाला उत्तर देताना, ते म्हणाले की त्यांच्या चित्रपटांचे संकलन ते स्वतःच करतात. “माझ्या चित्रपटात लाँग शॉट्स असतात. मी केवळ त्यांना जोडत जातो. तुम्हांला त्याची लय शोधावी लागते आणि त्यांना ठोक्याप्रमाणे मोजावे लागते. संकलन ही लयबद्ध प्रक्रिया आहे. संगीतकार म्हणून मी ते करू शकतो.”  

चित्रपटात संगीताकडे असलेल्या भूमिकेबद्दल बोलताना, संगीत हा खरोखरीच स्वतंत्र घटक आहे असे मत लव डियाझ यांनी व्यक्त केले. “चित्रपटात तुम्ही काव्य, संगीत, हालचाली, नृत्य आणि सगळे विश्व सामावू शकता. चित्रपट या घटकात सर्व सामावून घेण्याची ताकद आहे,” ते म्हणाले.

सिनेमा हे एक माध्यम म्हणून जीवनातील सगळ्या घटना आणि सत्य सादर करण्याच्या बाबतीत बरेच रेंगाळते हे सांगून दिग्दर्शक म्हणाले की तरीही चित्रपटात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे. मणी कौल, सत्यजित रे आणि रित्विक घटक यांचे भारतीय चित्रपट आवडतात असे दिग्दर्शक म्हणाले.

‘व्हेन द वेव्हज आर गॉन’ हा चित्रपट म्हणजे अलेक्झांडर ड्युमा यांच्या ‘द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो’ या चित्रपटाचे स्वैर रुपांतर आहे असे अनेक परीक्षणांतून म्हटले असले तरी दिग्दर्शक हा आरोप अमान्य करून आपला चित्रपट लिओ टॉलस्टॉय तसेच फियोदोर दोस्तोव्हस्की यांच्यासारख्या रशियन लेखकांच्या कलाकृतीवर आधारित आहे असे सांगतात.

 

दिग्दर्शकाविषयी थोडेसे: लव डियाझ या फिलिपिनो दिग्दर्शकाचे चित्रपट कालावधीच्या नव्हे तर अवकाश आणि निसर्गाच्या तालावर चालतात.

 

* * *

PIB Mumbai | Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1879315) Visitor Counter : 181