माहिती आणि प्रसारण मंत्रालय

आयुष्यातील तत्वाविषयी बोलण्याची हीच योग्य वेळ; खूप कमी लोक आयुष्य असे जगतात: 53व्या इफ्फीमधील चित्रपट ‘महानंदा’चे दिग्दर्शक अरिंदम सिल


“या देशात कोणीही - साबर आणि मुंडां या आदिवासींसाठी इतके काम केले नाही, जितके महाश्वेता देवी यांनी केले.”

महानंदामधली सगळी गाणी आदिवासी शैलीतील आहेत, त्यात धोद्रो बनम आणि हाडापासून तयार केलेली बासरी अशा आदिवासी वाद्यांचा वापर आहे: पं. बिक्रम घोष

Posted On: 26 NOV 2022 10:45PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 26 नोव्‍हेंबर 2022

 

“आज आपण ज्यांचा खरोखर शोध घेत असतो, ते भारतातील खरे नायक आहेत. कदाचित त्यांना देशाचे राष्ट्रपती कोण आहेत, ही माहिती नसेल, किंवा कोलकाता, मुंबई ही शहरे कुठे आहेत, ही माहिती नसेल, पण तरीही हेच आपल्या भारताचे खरे नायक-नायिका आहेत. ‘महानंदा’, हा चरित्रपट, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना वर उल्लेख केलेल्या मताचे प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे महाश्वेता देवी यांचे कार्य जगातील सगळ्यांना अनुकरणीय वाटेल, प्रेरक वाटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅनोरामा-फीचर फिल्म विभागात हा बंगाली चित्रपट दाखवण्यात आला आहे.

गोव्यात इफफीच्या टेबल टॉक्स या  पत्रकार परिषदेत या चित्रपटाचे दिग्दर्शक अरिंदम सिल यांनी यांनी ह्या आजच्या गुंतागुंतीच्या जगात, विषयावर चित्रपट निर्मिती करणे किती महत्वाचे होते, ही अधोरेखित केले. ‘आयुष्यातील तत्वे, मूल्ये याविषयी बोलण्याची हीच योग्य वेळ आहे, कारण आज फार कमी लोक असे आहेत, जे असे आयुष्य जगतात. महाश्वेता देवी अशाच काही लोकांपैकी होत्या ज्या मूल्ये आणि तत्वे यांच्यानुसार जगल्या. आणि मला असे वाटते की आता आपण आपल्या मुलांनाही तत्वे आणि मूल्याधिष्ठित आयुष्य जगायला शिकवले पाहिजे.”

मग हा चित्रपट बनवण्याची प्रेरणा मला कशी आणि कुठून मिळाली? तर मला असणारी जबाबदारीची जाणीवच या चित्रपटासाठी प्रेरणा देणारी होती, असे दिग्दर्शक अरिंदम सिल यांनी सांगितले. “महाश्वेता देवी यांच्यासारख्या महान व्यक्तींचे जीवन कार्य जगापुढे आणण्यासाठी, आमच्यासारख्या चित्रपट निर्मात्यांनी पुढाकार घेणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे, असे मला वाटले. त्यांच्यासारख्या व्यक्तीला आज आपण सर्वांनी विस्मृतीत टाकले आहे, मात्र, अमेरिकेतील विद्यापीठांत त्यांचे जीवनकार्य शिकवले जाते. भारतातील विद्यापीठांमध्ये मात्र आपण त्यांच्याविषयी बोलतही नाही.”

कोणती तत्वे आणि मूल्ये यांच्यासाठी महाश्वेता देवी आपले आयुष्य वेचले ? आणि ती कोणती तत्वे आहेत, ज्यामुळे महाश्वेता देवीच्या आयुष्याची कथा सांगणे आवश्यक होऊन जाते? महाश्वेता देवींच्या आयुष्याची कथा, वैभवापासून ते वैराग्यापर्यंत जाणारी कथा आहे, असे अरिंदम सिल सांगतात. “ त्या एका जमीनदारांच्या कुटुंबात जन्माला आल्या होत्या, मात्र त्यांचा विवाह साम्यवादी विचारसरणी असलेल्या कुटुंबात झाला होता. त्यांचे पती आणि साम्यवादी नाटककार, बीजॉन भट्टाचार्य यांनी, आपल्या तत्वांना मुरड घालून केवळ काही पैशांसाठी सिनेमाच्या सवंग मनोरंजन करणाऱ्या पटकथा लिहिल्या म्हणून महाश्वेता देवी यांनी आपल्या पतीचा त्याग केला होता. इतक्या जुन्या काळी, केवळ आपल्या तत्वासाठी, पती आणि मुलाला सोडून देण्याची हिंमत महाश्वेता देवी यांनी दाखवली होती. मात्र अतीव निराशेच्या क्षणी त्यांनी आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने या दुर्घटनेतून त्या वाचल्या, आणि  देशाला एक सर्वात मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या लाभल्या.”

महाश्वेता देवी यांनी भारतातील खऱ्या लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी, आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते, असे दिग्दर्शक सील यांनी सांगितले. “त्यांनी आदिवासी समुदायासाठी, विशेषतः साबर आणि मुंडा आदिवासींसाठी जे काम केले, तेवढे काम भारतात कदाचितच कोणी केले असेल. महाश्वेता देवी आणि मेधा पाटकर या आदिवासी समुदायाच्या चळवळीतल्या लढवय्या होत्या. महाश्वेता देवी एकदा म्हणाल्या होत्या, “ आम्ही ज्यांच्यासाठी संघर्ष करतो आहोत, तेच भारतातले खरे नागरिक आहेत.कदाचित देशाचे राष्ट्रपती कोण, किंवा कोलकता, मुंबई ही शहरे कुठे आहेत, हे त्यांना सांगता येणार नाही, पण तरीही, हेच भारताचे खरे नागरिक आहेत.’

आपल्या अखेरच्या काळापर्यंत, महाश्वेता देवी यांनी आपला संघर्ष आणि कार्य सुरुच ठेवले होते. त्या अशा लोकांसाठी लढा देत होत्या, ज्यांना आपल्या समाजात तथाकथित मागास वर्ग म्हटले जाते. मात्र खरे तर, याच लोकांनी खऱ्या अर्थाने ब्रिटिशांशी लढा दिला होता.”

“महाश्वेता देवींना जनमानसाचा मोठा पाठिंबा होता, वनवासी त्यांना देवीच समजत असत.” असेही सील यांनी सांगितले. आम्ही आमच्या चित्रपटातून हीच सगळी वस्तुस्थिती मांडली आहे, असेही ते पुढे म्हणाले.

एक कार्यकर्ती म्हणून महाश्वेता देवींबद्दल बोलणे यावर चित्रपटाचा भर होता, असे दिग्दर्शकाने सांगितले. त्यांना या चरित्रचित्रपटात महाश्वेता देवी फक्त साहित्य अकादमी पुरकर विजेत्या, किंवा रामन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या म्हणून दाखवायच्या नव्हत्या, तर भारताच्या खऱ्या लोकांसाठी, त्यांनी केलेला खराखुरा संघर्ष त्यांना दाखवायचा होता. तर, शीर्षक काय सांगते? “महानंदा नदी प्रमाणे त्यांची तत्वे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे प्रवाहित झाली पाहिजेत,” अरिंदम सील म्हणाले. योगायोगाने, चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पंडित बिक्रम घोष यांना कालच संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे. अरिंदम सिल यांच्यासोबत इफ्फी टेबल टॉक मध्ये सहभागी होत, त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प सांगीतिक दृष्ट्या आव्हानात्मक होता. सर्वात महत्वाचे आव्हान होते, चित्रपटा भोवती तयार झालेलं मळभ दूर करणे. “या चित्रपटाबद्दल सातत्याने एक अशुभ वातावरण निर्माण होत होते. मळभ हे एक दुःखद घटना असते, मृत्यूची, दुःख आणि अनपेक्षित धक्के, ज्यामुळे त्यांचे आयुष्य भरून गेले होते.”

हे मळभ दूर करण्यासाठी या चित्रपटाला पूर्णपणे आदिवासी शैलीत पार्श्वसंगीत देण्यात आले आहे, दिग्दर्शक म्हणाले. “ही अशुभता संपूर्ण आदिवासी संगीतामुळे चित्रपटाशी जोडली गेली आहे. सर्व गाणी आदिवासी आहेत. सुबीर दासमुंशी यांची गीते मुंडा जमातीच्या भाषेत आहेत. आम्ही त्यांची धोर्डो बानम आणि  हाडापासून बनविलेली बासरी अशी वाद्ये वापरली आहेत.”

मात्र, शास्त्रीय संगीत आणि राग यांच्याऐवजी आदिवासी संगीत वापरून त्यांचे मातुल घराणे दाखविण्यात आले आहे, जे त्या काळी समाजात अतिप्रतिष्ठित होते.

बिक्रम घोष यांनी सांगितले की चित्रपटाचा आवाका बघता, कशा प्रकारे संगीताचे दोन्ही प्रकार एकमेकांत गुंफण्यात आले आहेत. “या चित्रपटात एक प्रसंग आहे, ज्यात महाश्वेता देवी 25 वर्षांच्या आहेत, आणि त्यानंतर लगेचच, कॅमेरा वळतो आणि 75 वर्षांच्या महाश्वेता देवी दिसतात. म्हणून ही भावना तयार करण्यासाठी संगीत एकमेकांत गुंफलेले असणे गरजेचे होते.”

बिक्रम घोष यांनी या चित्रपटाच्या सांगीतिक प्रवासाची माहिती दिली. “हा चित्रपट अत्यंत कठोर, वास्तववादी आणि काळ्या मात्र खिळवून ठेवणाऱ्या सत्यघटनांवर आधारलेला आहे. त्यामुळे त्याचे संगीतही स्थानिक प्रकारातील हवे होते हे लक्षात घेऊनच, मी संथाळ आणि मुंडा जमातीचे संगीतकार निवडले, जेणेकरून सिनेमाचं संगीत अधिकाधिक देशी आणि वास्तववादी वाटेल.”

प्रादेशिक चित्रपट निर्माते, विविध भारतीय भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करण्यासाठी घेत असलेल्या परिश्रमाची इफ्फीमध्ये यथोचित दखल घेण्यात आली आहे, असे समाधान, अरिंदम सिल यांनी व्यक्त केले. “आम्ही खरोखरच, अतिशय कमी पैशात, मोठमोठे, महत्वाचे सिनेमा तयार करतो आहोत.” असं ते म्हणाले.  

अभिनेत्री गार्गी रॉयचौधुरी, ज्यांनी या चित्रपटात, वय वर्षे 30 ते 75 या प्रदीर्घ काळातील महाश्वेता देवींची भूमिका साकारली आहे, त्यांनी सांगितले की, महाश्वेता देवी होण्याचा हा प्रवास त्यांना मनापासून भावला. बाह्य रूप आणि वेशभूषा करुन, त्या महाश्वेता देवींच्या अंतरंगात शिरत असत.

 

* * *

PIB Mumbai | Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879312) Visitor Counter : 262


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil