माहिती आणि प्रसारण मंत्रालय

53 व्या इफ्फीIFFI मधील ‘इन-कन्वर्सेशन' या सत्रात 'सिनेछायाचित्रण तंत्रज्ञानातील बारकावे’ या विषयावर, सुप्रसिद्ध सिनेछायाचित्रकारांनी केले मार्गदर्शन


सिनेछायाचित्रण हे कला आणि विज्ञानाचे मिश्रण आहे, आपल्याला त्यात अधिकाधिक तंत्रज्ञानाका वापर करायला हवा: आर. रत्नवेलू

भारतीय लोक जगातील सर्वात उत्तम कथाकार आहेत, मात्र आपल्याला तंत्रज्ञानात अधिक सुधारणा करायला हवी: मनोज परमहंस

कथालेखन हा गाभा आहे; तुम्ही जितके स्थानिक पातळीवर काम कराल, तेवढे तुम्ही अधिक वैश्विक असता: सुप्रतिम भोल

Posted On: 26 NOV 2022 10:20PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 26 नोव्‍हेंबर 2022

 

आजच्या काळातील यशस्वी सिनेछायाचित्रकार- ज्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मन आणि हृदयावर दीर्घकाळ छाप सोडली आहे, असे, आर रत्नवेलू, मनोज परमहंस आणि सुप्रतीम भोल यांनी आज 53 व्या इफ्फी दरम्यान झालेल्या ‘इन-कन्वर्सेशन या सत्रात “सिनेछायाचित्रकरितेच्या तंत्रज्ञानातील बारकावे’ या विषयावर मार्गदर्शन केले.

एक यशस्वी सिनेछायाचित्रकार होण्यासाठी काय आवश्यक असतं यावर आपले दृष्टिकोन मांडतांना ह्या तिघांनीही, प्रचंड परिश्रम, स्वतःला काळानुरुप बदलत राहणे, अद्ययावत होत राहणे, हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे, असे मत व्यक्त केले.

सिनेछायाचित्रकार आर. रत्नवेलू, मनोज परमहंस आणि सुप्रतीम भोल यांनी आज 53 व्या इफ्फी दरम्यान झालेल्या ‘इन-कन्वर्सेशन सत्रात मार्गदर्शन केले. पद्मश्री भावना सोमय्या यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले

त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आणि एक यशस्वी सिनेछायाचित्रकाराविषयीच्या त्यांच्या व्याख्येविषयी बोलतांना, आर रत्नवेलू म्हणाले. की दिग्दर्शक ज्या चित्रपटाची आपल्या मनात कल्पना करतात, त्याला सिनेछायाचित्रकार कॅनव्हासवर उतरवतात. “आम्ही तंत्रज्ञ नाही तर असे सृजनशील कलावंत आहोत, जे सिनेमाची जादू निर्माण करण्यासाठी आपले संपूर्ण कौशल्य वापरतात. यांच्यावर महत्वाची जबाबदारी असल्याने, आम्ही प्रचंड तणावाखाली काम करतो. कारण आमचे योगदान सिनेमासाठी खूप काही देणारे असते. आम्ही चित्रपट उद्योगातील, अज्ञात नायकांसारखे आहोत, ज्यांना सेटवर सर्वात आधी पोचावे लागते आणि शूटींग संपल्यावर आम्हीच सर्वात शेवटी सेट सोडतो.” असं त्यांनी सांगितलं.

आपले कौशल्य तयार करण्यासाठी काय तंत्रज्ञान वापरतात, याविषयी रत्नवेलू यांनी माहिती दिली. वारणम आयराम, एन्थिरन (रोबोट) या चित्रपटांसाठी आपल्या कॅमेर्‍याने जादू निर्माण करण्यासाठी ओळखले जाणारे रत्नवेलू, यांनी सांगितले की सिनेछायाचित्रण ही केवळ कला नाही, तर  कला आणि विज्ञान यांचे मिश्रण आहे. या क्षेत्रात ज्यांना टिकायचे असेल, त्यांनी, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करायला हवा.

आपला आतापर्यंतचा प्रवास कथन करताना रत्नवेलू पुढे म्हणाले की, चित्रपटाशी संबंध नसलेल्या पार्श्वभूमीतून येऊनही आपला आतापर्यंतचा या क्षेत्रातला प्रवास यशस्वी झाला आहे. “ मी 25 वर्षांनंतरही या क्षेत्रात पाय रोवून उभा आहे.त्यामुळे, इथे येण्यासाठी तुम्‍हाला पार्श्‍वभूमीची आवश्‍यकता नाही हे मी सांगू शकतो, एकदा तुम्‍ही समर्पित भावनने आणि प्रामाणिकपणे काम केलं की तुमच्‍या मनाप्रमाणे प्रगती करता येईल. मी सतत स्वतःला अद्यायवत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.” असेही त्यांनी सांगितले.

2008 सालच्या, रजनीकांत अभिनित रोबो चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या डिजिटल परिवर्तनाच्या बाबतीत बोलतांना ते म्हणाले की रोबो तयार करतांना, व्हीएफएक्स चा वापर केल्याचं त्यांनी, सांगितले. हे आव्हान खूप मोठे होते, मात्र तरीही, मी ते काम करण्याचे ठरवले आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केला. आपल्याला जर या स्पर्धेत टिकून राहायचं असेल, तर, आपल्याला स्वतःला सतत अद्यायवत ठेवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

सिनेछायाचित्रकार सुप्रतिम भोल यांनी आर रत्नवेलू, मनोज परमहंस उपस्थितांशी संवाद साधतांना

मनोज परमहंस यांनी तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपट उद्योगात काम केले आहे. चित्रपट निर्माते होणे हे कधीही पूर्ण न होणारे स्वप्न असून, त्यासाठी आपल्याला सतत अद्ययावत असावे लागते, असा सल्ला त्यांनीही दिला. ‘भारतीय लोक जगातले सर्वोत्तम कथाकार आहेत, मात्र तंत्रज्ञानात आपल्याला अजून खूप प्रगती करण्याची गरज आहे.” असे ते म्हणाले. कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे सांगत ते पुढे म्हणाले. की तंत्रज्ञानापासून आपण बरेच काही शिकू शकतो. प्रत्येक जण छायाचित्रकार असतात, आणि आता मोबाईल देखील इतके उत्तम आहेत, त्यामुळे, जेव्हा आपण ते करतो, तेव्हा आधीपेक्षा अधिक उत्तम  करायला हवे, असे ते म्हणाले.

दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनानुसार सिनेछायाचित्रकारिता करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाचा एक किस्सा सांगताना ते म्हणाले की एकदा त्यांना लडाख-चीन सीमेपर्यंत 200 किमीचा प्रवास गोठवणाऱ्या थंडीत करावा लागला होता, कारण ते एकमेव ठिकाण आहे जिथे आपल्याला नैसर्गिक झरा पाहायला मिळतो. “हा अनुभव माझ्यासाठी खरोखर जादूसारखा होता, फक्त एका शॉटसाठी आम्ही एवढे मोठे अंतर कापले. पण जेव्हा तो झरा दिसला, तेव्हा आम्ही आमचे सगळे कष्ट विसरलो,”असे त्यांनी सांगितले.

सिनेछायाचित्रकार मनोज परमहंस यांचा इफ्फी 53 दरम्यान इन - कॉनव्हरसेशन सत्रात करण्यात आला सत्कार

मनोज यांच्या मतानुसार, हे अधिक सोपे करण्यासाठी, अनरीयल इंजिन सारखी अनेक मोफत सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत, जे सिनेछायाचित्रकारांसाठी खरोखर खूपच सोयीचे आहेत. “हे इतके सोपे आहे की छायाचित्रणाला जाण्यापूर्वी आपण सर्व खऱ्याखुऱ्या परिस्थितींची तयारी करू शकतो,” ते म्हणाले. उदयोन्मुख सिनेछायाचित्रकारांना त्यांनी असा सल्ला दिला की, ज्यांना आपले कौशल्य अधिक धारदार करायचे असेल त्यांनी अशा सॉफ्टवेअर आणि व्हिडीओ प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. सिनेछायाचित्रकार म्हणून अपराजितो आणि अविजार्तिक या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे सुप्रतीम भोल असे म्हणतात की योग्य आणि अचूक छायाचित्रण घडून येण्यासाठी तुम्हाला कुणाचे तरी आशीर्वादच असावे लागतात. “जरी अनेकदा आम्ही पूर्ण तयारी केलेली असते, जेव्हा आम्ही सिनेमा बघतो, तो मनाला भिडत नाही कारण ते अदृश्य आशीर्वाद सोबत नसतात.”

सिनेछायाचित्रकार आर रत्नवेलू यांचा इफ्फी 53 दरम्यान इन - कॉनव्हरसेशन सत्रात करण्यात आला सत्कार

आपल्या कलेने आयुष्यावर काय प्रभाव टाकला आहे, हे सांगताना सुप्रतीम म्हणाले, “मी वाचलेली सगळी पुस्तकं आणि कविता, मी काढलेली सर्व छायाचित्रे, मी काढलेली चित्रे, मी स्नानगृहात म्हटलेली सगळी गाणी, याचा एकत्रित परिणाम म्हणजे जे काही तुम्ही दाखवता, ते जिवंत होतं, तुमचं आयुष्य सिनेमाच्या रूपाने व्यक्त होतं.”

त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल विचारल्यावर सुप्रतीम म्हणाले संहितेशी प्रामाणिक राहणे हेसार्वात महत्वाचे आहे. “तुमच्या अंतःप्रेरणे प्रमाणे काम करत राहणे, हाच सगळ्यात मुलभूत नियम आहे. शेवटी, आपण सर्व मानव आहोत, तुम्ही जितके आपल्या मुळाकडे जाल, तितकेच तुम्ही जागतिक पातळीवर पोहोचाल.” असे त्यांनी सांगितले.

या सत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सिने पत्रकार, टीकाकार, पद्मश्री भावना सोमय्या यांनी केले.

सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था आणि ईएसजी यांनी संयुक्तपणे इफ्फी 53 दरम्यान मास्टर क्लासेस आणि इन - कॉनव्हरसेशनचे आयोजन केले आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक पैलूबद्दल चित्रपट विद्यार्थी आणि चित्रपट रसिकांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदा मास्टरक्लास आणि इन - कॉनव्हरसेशनची एकूण 23 सत्रे आयोजित करण्यात येत आहेत.

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879220) Visitor Counter : 150


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil