माहिती आणि प्रसारण मंत्रालय

53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात हिंदी चित्रपटसृष्टीतील लिंगभाव सहभाग या विषयावरच्या मास्टरक्लासचं आयोजन


चित्रपट निर्मिती प्रक्रियेतल्या सर्जनशील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अत्यल्प : प्रा. लक्ष्मी लिंगम

चित्रपटांच्या सेटवरच्या महिलांच्या उपस्थितीमुळे पुरुषांच्या वर्तनात आपोआपच सकारात्मक बदल घडून येतात : पुष्पन कृपलानी

संवाद साधणं आणि स्वतः नियम आखून त्याप्रमाणे वागणं यातून लिंगभाव समानता साध्य करता येईल : रश्मी लांबा

सत्तेत असलेल्या स्त्रिया पुरुषांप्रमाणेच वागतात : शिल्पा फडके

Posted On: 24 NOV 2022 10:50PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 24 नोव्‍हेंबर 2022

 

गोव्यात सुरू असलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी अंतर्गत पणजी इथल्या टाटा समाजविज्ञान संस्थेच्या संयुक्तविद्यमानं मास्टरक्लासचं आयोजन केलं गेलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील लिंगभाव सहभाग हा या मास्टरक्लासचा विषय होता. यावेळी "रुपेरी पडद्याच्या चौकटी भेदणं : लिंग भाव आणि हिंदी सिनेजगतातलं  काम" (“ब्रेकिंग द स्क्रीन सीलिंग: जेंडर अँड वर्क इन हिंदी सिनेमा”) या विषयावर सादरीकरण करण्यात आलं. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील लिंगभावविषयक पडद्यावरील आणि पडद्यामागील कामांच्याबाबतीत सखोल संशोधनावर आधारलेल्या बाबींच्या आधारे प्रकाशही टाकला गेला. या उपक्रमाअंतर्गत 35 चित्रपटांतील एकूण 1930 पात्रांचे पडद्यावरील लिंगभाव प्रतिनिधित्व, या अनुषंगानं विविध लिंगभावाअंतर्गत साकारलेल्या भूमिका आणि त्यांचे प्रकार, त्यांचे व्यवसाय तसंच इतर मापदंड याबाबतीलं विश्लेषणही यावेळी केलं गेलं. या अभ्यासाअंतर्गत सिने पथकातील महिला सदस्यांच्या अनुषंगानं त्यांना चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत प्राधान्यानं ज्या विभागात काम दिलं जातं असे विभाग, त्यांना दिल्या जाणाऱ्या कामाचा स्तर, तसेच चित्रपट पुरस्कार विजेत्यांमधलं महिलांचं प्रमाण याबद्दलची अभ्यासपूर्ण मतं आणि निरीक्षणही यावेळी मांडली गेली. 

या मास्टरक्लास साठी आलेल्या प्रतिथयश तज्ञामध्ये टाटा समाजविज्ञान संस्थेच्या संशोधन पथकातील प्रा.लक्ष्मी लिंगम, प्रा.शिल्पा फडके आणि कु.रश्मी लांबा, तसेच  राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट समीक्षक कु.मिनाक्षी शेड्डे, आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माते पुशन कृपलानी यांचा समावेश होता. या सर्व तज्ञांनी 'हिंदी चित्रपटसृष्टीतील लिंगभाव सहभाग ' या विषयावरावचे आपले अनुभव आणि निरीक्षणं तसेच संशोधनाअंती हाती आलेले निष्कर्ष उपस्थितांसमोर मांडले, तसंच संबंधीत मुद्यांवर उपस्थितांसोबत संवादही साधला. यासोबतच हिंदी सिनेजगताच्या अवकाशात स्त्री-पुरुष अशा वैविध्यतेच्या बाबतीत जाणवणारी कमतरता दूर करण्यासह, सिने निर्मितीविषयक सर्व प्रक्रियांमध्ये स्त्रियांचा प्रत्येक टप्प्यावरचा सहभाग वाढावा यासाठी आपण काय करायला हवं यासंबंधीच्या मुद्यांवरही मास्टर क्लास साठी उपस्थित असलेल्या तज्ञानी भाष्य आणि मार्गदर्शन केलं.  यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात यावरही त्यांनी चर्चा केली. यावेळी टाटा समाजविज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या दोन लघुटवजा ध्वनीचित्रफिती / सार्वजनिक सेवांविषयक चित्रफिती दाखवल्या गेल्या. या चित्रफितींना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यापैकी एका चित्रफितीतून महिलांसाठी चित्रपटाच्या सेटवर स्नानगृह आणि वैयक्तिक स्वच्छताविषयक सुविधांचा अभाव असल्याचा विषय मांडला होता, तर दुसऱ्या चित्रफितीमधून सिनेमांमधून रुळलेल्या सौंदर्याच्या परिभाषेवर टीका करणारा विषयक मांडला गेला होता.

माध्यमं आणि सांस्कृतिक अभ्यास अभ्यासक्रमाच्या अधिष्ठाता प्रा. लक्ष्मी लिंगम, यांनी आपल्या सादरीकरणातून चित्रपट निर्मिती प्रक्रियेतल्या स्त्रियांच्या सहभागाविषयीचं मत मांडतांना सांगितलं की, चित्रपट निर्मिती प्रक्रियेत स्रिया या प्रामुख्यानं निर्मिती पश्चातच्या टप्प्यात गुंतलेल्या दिसतात, मात्र चित्रपट निर्मितीशीसंबंधीत सर्जनशील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग तुलनेने कमी असतो. गेल्या 75 वर्षांत देशात केवळ 4 महिलांनाच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली, गेल्या 72 वर्षांत केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सीबीएफसी) अध्यपदाची संधीही केवळ 4 महिलांनाची मिळाली, इतकंच नाही तर गेली 13 वर्षे या मंडळातल्या सदस्यांमध्ये महिलांचं  प्रमाण केवळ 29% इतकंच असल्याच्या वस्तुस्थितीकडेही त्यांनी आपल्या सादरीकरणातून लक्ष वेधलं. एका अभ्यासानुसार, पुरुष आणि महिलांचे व्यवसाय रुढीपंरंपरांनुसारच असल्याचं आढळून आल्याचंही त्यांनी नमूद केलं. आपण याबाबतीतलं संशोधन हाती घेण्यामागे, चित्रपट उद्योग क्षेत्रासोबत संवाद सुरू करता येणं हा उद्देश होता असं त्या म्हणाल्या. समानता प्रस्थापित करण्यासाठी अजूनही खूप काम करावं लागेल. अनेक चित्रपटांमधून प्रेम भावना व्यक्त करण्याचं पहीलं पाऊल पुरुषांकडूनच टाकलं जातं, आणि त्यातही महिलांच्या संमतीची कल्पनाच गृहीत धरलेली नसते, स्रियांचा होकार मिळवण्यासाठी नायकाकडून अनेक बेकायदेशीर मार्ग अवलंबले जातात, यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो, असं त्यांनी सांगितलं. ‘निर्भया’ प्रकरणानंतर कायद्यांमध्ये बरेच बदल झाले आहेत, समाजव्यवस्थेच्या दृष्टीने हे मोठे बदल आहेत, आणि सिने जगतानं या बदलांची दखल घेणं आवश्यक आहे असं लिंगम यांनी नमूद केलं.

गोल्डफिश चित्रपटाचे प्रख्यात दिग्दर्शक श्री पुशन कृपलानी यांनी त्यांच्या सेटवर महिलां टक्केवारी सातत्यानं वाढत असल्याचं सांगून, हा त्यांच्याकरता आनंददायी अपघात असल्याचं मत व्यक्त केले. सेटवर महिलांच्या उपस्थिती वाढल्यानं पुरुषांच्या वर्तनातही सकारात्मक बदल घडून आल्याचे अनुभव त्यांनी मांडले.  आपण जेव्हा केव्हा चित्रपटाच्या कर्मचारी पथकासोबत संवाद साधतो, तेव्हा कायमच विरामचिन्हे म्हणून बरेच शब्द वापरत असल्याचं आणि हे शब्द आता आपल्या संवादकोषाचा भाग बनल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय सेटवर शपथ घेणं ही आता नित्याची प्रक्रिया झाली आहे, यातून सौहार्दाचं दर्शन तर घडतंच पण यात महिला सदस्यांच्या असण्यामुळे अधिकची भर पडली आहे असं त्यांनी सांगितलं. अभिनेत्री कल्की हिच्या मुलासाठी सेटवरच स्वतंत्र व्यवस्था केल्याचा अनुभवही कृपलानी यांनी मांडला. सिने उद्योगजगतातल्या गैरवर्तणूवरही कृपलांनी यांनी भाष्य केलं. छायाचित्रणकार म्हणून आपण ज्या ज्या खोल्यांमध्ये शिरलो आणि वावरलो आहे, त्या सगळ्यांना दुर्व्यवहाराचा स्पर्ष झालेला होताच, पण मला स्वतःला त्याचा भाग व्हायचं नव्हतं, आणि म्हणूनच मी स्वतंत्रपणे चित्रपट निर्मिती करता यावी या दिशेने वळलो असं त्यांनी सांगितलं. 

‘व्हाय लॉइटर’ या पुस्तकाच्या सहलेखिका आणि ‘अंडर द ओपन स्काय’ या माहितीपटाच्या सह-दिग्दर्शिका प्रा. शिल्पा फडके यांनी, महिलांमधला साक्षरतेचा दर वाढता असूनही, चित्रपटविषयक कामांच्या बाबतीतला त्यांचा सहभाग कमी होत चालला असल्याच्या मुद्यावर प्रकाश टाकला. सत्तेत असलेल्या महिला पुरुषांप्रमाणेच वागतात. मात्र त्यांच्या तिथे असण्यानेही परिस्थितीत खूप फरक पडणार आहे, सार्वजनिक ठिकाणीही स्त्रीया इतरांचं जगणं अधिक सुलभ करत असतात असं त्यांनी सांगितलं.

रश्मी लांबा यांनी आपल्या सादरीकरणातून, चित्रपटांमधून महिलांनाही आदर्श व्यक्तीमत्व म्हणून का दाखवायला हवं याची गरज बोलून दाखवली. “आपण जे पाहतो,  ते आपणही बनू शकतो हाच गीना डेव्हिस इन्स्टिट्यूटचा मंत्र आहे, आणि त्यामुळेच मी स्वतःला त्यांच्यासोबत जोडून घेऊ शकतेल असं लांबा यांनी सांगितलं. या विचारानेच आपल्यालाला खरी प्रेरणा मिळाली असल्याचं त्या म्हणाल्या. या संस्थेतून लैंगिक समानता आणि पौरुषत्वाच्या रुढीपरंपरा वादावर अभ्यास केला जात आहे, ज्यामुळे स्त्रियांच्या भूमिकाही साचेबद्ध होऊ लागल्या असल्याचं त्या म्हणाल्या. अमेरिकेत केलेल्या एका संशोधनात तिथे कौटुंबिक चित्रपटांमध्ये लिंगभाव तटस्थता साध्य करण्यात यश मिळाल्याचं दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं. यामागचं महत्वाचं कारण हेच आहे की, तिथले प्रेक्षक हे सिनेमातल्या प्रत्येक पात्राशी स्वतःचं साधर्म्य साधू शकत असल्याचं त्या म्हणाल्या. भारतात असे बदल घडवून आणण्यासाठीही हा अभ्यास कामी येईल असं त्या म्हणाल्या. संवाद साधणं आणि स्वतः नियम आखून त्याप्रमाणे वागणं यातून लिंगभव समानता साध्य करता येईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. युवा वर्गानं या बाबींकडे विशेषतः लैंगिकतेच्या नजरेनं वापरला जाणारा सिनेमाचा कॅमेरा आणि सिनेमातली तशा अर्थाची भाषा याकडेही लक्ष द्यायला हवं असं त्या म्हणाल्या.

सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षकासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मीनाक्षी शेड्डे यांनी केरळमधील अभिनेत्रींसोबत झालेल्या दुर्व्यवहाराच्या प्रकरणाकडे लक्ष वेधलं. सिनेसृष्टीत काम करत असलेल्या तिथल्या महिलांच्या वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह (WCC) ही संघटना खंबीरपणे या प्रकरणातल्या पिडीतेच्या मागे उभी राहिली, त्यासोबतच सिने क्षेत्रात महिलांना सुरक्षित वातावरणात काम करण्याचा हक्क मिळावा यासाठीचा लढाही त्यांनी उभारल्याचं त्यांनी सांगितलं. पण यानंतर केरळमधल्या अनेक चित्रपटविषयक संस्था, संघटना तसंच केरळाच्या चित्रपटसृष्टीच्या मुख्य प्रवाहातल्या घटकांनी वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह (WCC) या संस्थेच्या सदस्य महिलांनाच शिक्षा देत, त्यांना काम देणं बंद करणं, एकटं पाडणं, सातत्यानं टीका करणं आणि बदनामी करणं यांसारखे प्रकार सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.


* * *

PIB Mumbai | Jaydevi PS/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878771) Visitor Counter : 333


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi