माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन’ हवामान बदल चळवळीविषयी सार्थक संवाद सुरु करण्याचा प्रयत्न
आमचा चित्रपट हवामान बदलाच्या संकटाविषयी टोकाच्या भूमिकेला पाठिंबा ही देत नाही आणि त्याचा शोधही घेत नाही: दिग्दर्शक डॅनियल गोल्डहाबर
गोवा/मुंबई, 24 नोव्हेंबर 2022
हवामान बदलाचे संकट हाताळण्यासाठी कुठलीही जादूची कांडी किंवा तातडीचा कुठलाच उपाय नाही. केवळ योग्य संवर्धनावर संवाद आणि हस्तक्षेप हीच किल्ली आहे. ‘हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन’ द्वारे आम्ही या महत्वाच्या विषयावर योग्य संवाद सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनियल गोल्डहाबर यांनी काढले.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/pipline-1YU48.jpg)
पत्र सूचना कार्यालयाने गोव्यात 53 व्या इफ्फी दरम्यान आयोजित ‘टेबल टॉक’ सत्रात ते मध्यम आणि महोत्सव प्रतिनिधींशी संवाद साधताना डॅनियल गोल्डहाबर यांनी निग्रहाने सांगितले की चित्रपट हवामान बदल विषयक टोकाच्या भूमिकेला पाठिंबा ही देत नाही आणि त्याचा शोधही घेत नाही. “काही लोक हवामान विषयक टोकाच्या भूमिकेकडे का ढकलले जात आहेत, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या टोकाच्या भूमिकेचे परिणाम काय होतील याबद्दल देखील आम्ही स्पष्टपणे बोललो आहोत,” ते म्हणाले. या चित्रपटाचा आशिया प्रीमियर इफ्फी 53 दरम्यान झाला.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/pipline-207KL.jpg)
हवामान बदलावर संवाद आणि त्याचा सामना करण्याचे प्रयत्न अतिशय मर्यादित आहेत हे ठासून सांगताना डॅनियल म्हणाले, “अशा प्रकारचे संवाद त्या कंपन्या आणि देश घडवून आणतात, ज्यांना हवामान बदलाच्या परिणामांतून काही लाभ मिळत असतो.” हवामान बदल हा एक अथांग सागर आहे, जो अजूनही आपल्याला पूर्णपणे समजलेला नाही यावर भर देत डॅनियल म्हणाले की हवामान बदलांचे परिणाम त्या देशांना लगेच भोगावे लागत नाहीत ज्या देशांमुळे हे बदल होत आहेत, मात्र जगाच्या इतर भागात ते जाणवतात. “याला तोंड देण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
‘हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन’ हा योग्यवेळी आलेला कडक थरारपट तरुण हवामान बदल कार्यकर्त्यांच्या चमूची गोष्ट आहे जे त्यांच्या निग्रही आणि टोकाच्या संकल्पाच्या जोरावर घातपात करून एक तेलाची पाईपलाईन उडवून देतात. व्यवस्थेच्या निर्णयांमुळे निर्माण झालेल्या हवामान समस्येवर उपाय म्हणून ते त्याच भाषेत उत्तर देत असतात. हा चित्रपट अँडर्स माल्म यांच्या 2021 साली प्रकाशित झालेल्या ‘हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन - लर्निंग टू फाईट इन अ वर्ल्ड ऑफ फायर’ या पुस्तकावर आधारित आहे. डॅनियलयांच्या मतानुसार या पुस्तकात, असे समर्थन करण्यात आले आहे, की जगाच्या इतिहासातील गेल्या काही दशकांतल्या प्रत्येक सामाजिक न्याय आंदोलनात घातपात आणि संपत्तीच्या नुकसानाचा काही न काही भाग होता. “या पुस्तकावर चित्रपट बनवून, पुस्तकापेक्षा वेगळी असली तरी, जर आम्ही या संकल्पनेचे नाट्यकरण केले तर काय होईल, आम्हाला हे बघायचे होते,” ते म्हणाले.
सध्याच्या काळातील अतिशय महत्वाच्या असलेल्या या विषयवार चित्रपट बनविण्याचे कारण सांगताना डॅनियल गोल्डहाबर म्हणाले, की या विषयाची त्यांना सखोल माहिती असल्याने ते कायमच या विषयावर चित्रपटात बनविण्यासाठी योग्य कथेच्या शोधात होते. “माझे पालक हवामान वैज्ञानिक आहेत. मी हवामान बदल आणि त्याच्याशी संबंधित चळवळ हे बघतच मी मोठा झालो आहे.” हा चित्रपट इफ्फी 53 मध्ये प्रदर्शित होण्याने जो आनंद झाला त्याबद्दल बोलताना डॅनियल गोल्डहाबर म्हणाले, युरोपियन पुस्तकातून घेतलेल्या, अमेरिकन संकल्पनेवर आधारित, हा एक अमेरिकन चित्रपट आहे. मात्र या चित्रपटाची प्रसिद्धी आशियन आणि इतर देशांत झाली तर आनंदच आहे, कारण याचा विषय हा जागतिक आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/pipline-41W5C.jpg)
चित्रपटाविषयी:
कथासार:
या कडक आणि योग्य वेळी आलेल्या थरारपटात तरुण पर्यावरणवाद्यांची एक चमू घातपाताने एक तेलाची पाईपलाईन उडवून देण्याची धाडसी मोहीम पार पाडतात, जी एका मोठ्या हल्ल्याचा भाग असते आणि काही अंशी त्यांनी हवामान बदलाच्या संकटावर दिलेले हे टोकाचे उत्तर आहे.
डॅनियल गोल्डहाबर हे लॉसएन्जेल्स आणि न्यूयोर्क इथे राहणारे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून दृश्य आणि पर्यावरण अभ्यासात पदवी घेतली आहे. डॅनियल गोल्डहाबर यांचा पहिला चित्रपट ‘कॅम’ (2018) हा होता. डॅनियल गोल्डहाबर यांचा उल्लेख एक चित्रपट निर्माता म्हणून झाला होता.
‘हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन’ चित्रपटाचा प्रीमियर टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्लॅटफॉर्म विभागात झाले होते.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![](http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Twitter-iconI0HR.jpg)
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878682)
Visitor Counter : 325