माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“लॉस्ट’ हा स्टुडिओमधला काल्पनिक बंदिस्त चित्रपट नाही, तर हे आयुष्यातील सत्य घटनांवर आधारित कथानक आहे.”: यामी गौतम
लॉस्ट हा रहस्यमय शोधांचा थरारपट असला, तरी त्यातून, आपली सहअनुभूती, प्रामाणिकपणा अशा हरवलेली मूल्यांचा शोध घेण्याची धडपड व्यक्त होते
गोवा/मुंबई, 23 नोव्हेंबर 2022
‘लॉस्ट’ हा काही स्टुडिओत तयार झालेला कल्पनिक आणि बंदिस्त चित्रपट नाही, तर, आयुष्यातल्या खऱ्या घटनांवर आधारलेले ते कथानक आहे.त्यामुळे हा चित्रपट समजून घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्या कथानकात शिरावं लागतं. त्या व्यक्तिरेखेतील सगळ्या बारकाव्यांचे मर्म समजून घ्यावे लागते. तुमच्या वैयक्तिक अनुभवांशी आणि आपल्या आजूबाजूच्या जगाशी त्याचे असलेले साधर्म्य समजून घेत, व्यक्तिरेखेचे अनुभव जगण्याचा प्रयत्न करावा लागतो,” असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम ने व्यक्त केले. गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव- इफ्फीमध्ये आयोजित, “टेबल टॉक्स’ हा संवादात्मक उपक्रमात ती बोलत होती.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/lost-1HLEQ.jpg)
या चित्रपटाची नायिका म्हणून व्यक्तिरेखा साकार करतांनाचा आपला अनुभव तिने यावेळी सांगितला. ‘जेव्हा अशा व्यक्तिरेखा साकारण्याची संधी तुम्हाला मिळते, तेव्हा ते एक मोठे आव्हान असते. अनेकदा आपल्याला वाटते की, कमीत कमी अभिनय,हाच उत्तम अभिनय आहे. आणि मी देखील अशाच विचाराने ही व्यक्तिरेखा साकारली. खरं सांगायचं तर मी ही भूमिका साकारण्याचा प्रयत्नच केला नाही, तर मी ती व्यक्तिरेखा जशी आहे, तशी त्यात शिरले.” असे यामीने पुढे सांगितले.
चित्रपटाचे दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय यांनी सांगितले की, या चित्रपटात माध्यमांच्या प्रामाणिकतेचा अत्यंत व्यावहारिक पद्धतीने अधोरेखित करण्यात आला आहे.
यामीच्या व्यक्तिरेखेविषयी आणखी माहिती देतांना, अनिरुद्ध रॉय यांनी सांगितले की, “ही व्यक्तिरेखा अत्यंत उत्कट अशा आंतरिक संघर्षातून जाते”
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/lost-2UZ4I.jpg)
आज हा चित्रपट इफ्फीमध्ये दाखवण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
चित्रपटाविषयी माहिती
1.दिग्दर्शक : अनिरुद्ध रॉय चौधरी
2. यामी गौतम (अभिनेत्री)
3.पंकज कपूर (अभिनेता)
4. तुषार पांडे (अभिनेता)
कथासार :
सत्य घटनांवर आधारित ‘लॉस्ट’ ही एक तरुण रंगमंच कलाकाराच्या अचानक बेपत्ता होण्यामागील सत्याचा अथक शोध घेत असलेल्या एका तेजस्वी तरुण स्त्री गुन्हे पत्रकाराची कथा आहे. शोध घेणारा साहसी थरारपट असलेल्या या चित्रपटात, सह-अनुभूती आणि सचोटी अशा हरवलेल्या मूल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न अधोरेखित होतो.
संपूर्ण संवाद बघण्यासाठी इथे क्लिक करा:
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878554)
Visitor Counter : 187