आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार 24-25 नोव्हेंबर, 2022 रोजी ओमानमध्ये सूक्ष्मजीवप्रतिबंधकांना प्रतिरोध करण्याची क्षमता (एएमआर) या तिसऱ्या जागतिक परिषदेत सहभागी होणार
Posted On:
23 NOV 2022 11:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2022
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे 24-25 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या ' सूक्ष्मजीवप्रतिबंधकांना प्रतिरोध करण्याची क्षमता(एएमआर) वरील तिसऱ्या जागतिक उच्च-स्तरीय मंत्रिस्तरीय परिषदेत' सहभागी होणार आहेत.
परिषदेच्या उद्घाटन सत्रादरम्यान प्रतिनिधीमंडळ प्रमुखांच्या निवेदनासाठी भारताच्या वतीने केंद्रीय मंत्री भारती पवार राष्ट्रीय निवेदन सादर करतील. परिषदेदरम्यान, डॉ. पवार इतर नेते, धोरणकर्ते, प्रमुख जागतिक तज्ज्ञ, खाजगी क्षेत्र ,नागरी संस्था , संशोधन संस्था आणि सूक्ष्मजीवप्रतिबंधकांना प्रतिरोध करण्याची क्षमता यावरील बहुपक्षीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विस्तृत चर्चा करतील. जीवाणूजन्य रोगांवर प्रतिजैविकांच्या वापराद्वारे होणाऱ्या उपचारांना प्रतिरोधक्षमता विकसित करणे हा जागतिक सार्वजनिक आरोग्याला सर्वात मोठा धोका आहे.
''एएमआर : धोरण ते एक आरोग्य कृती ' या संकल्पनेअंतर्गत ही परिषद ' सूक्ष्मजीवप्रतिबंधकांना प्रतिरोध करण्याच्या क्षमतेचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करेल आणि 2014 आणि 2019 मध्ये नेदरलँड्समध्ये झालेल्या दोन उच्च-स्तरीय मंत्री परिषदेच्या यशाच्या आधारे उपाय शोधेल. या परिषदेमुळे सहभागी देशांसाठी 2024 मध्ये 'एएमआर ' वरील संयुक्त राष्ट्र आमसभेच्या उच्च-स्तरीय बैठकीत धाडसी आणि विशिष्ट राजकीय वचनबद्धतेसह उपस्थित राहण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878405)