माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जर्मन चित्रपट डिस्टंझ हा महामारीच्या ‘काळाचा दस्तावेज’
एक समस्या असण्यापेक्षा कोविड महामारी आपल्या आतमध्ये असलेल्या सर्व समस्या पुढे आणण्यासाठी उत्प्रेरक ठरली : दिग्दर्शक लार्स नॉर्न
गोवा/मुंबई, 23 नोव्हेंबर 2022
जर्मन चित्रपट डिस्टंझ हा महामारीच्या काळात बनलेला ‘काळाचा दस्तावेज ’ आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शक लार्स नॉर्न हे विनाशकारी महामारीमुळे सर्वदूर निर्माण झालेल्या भीती आणि अनिश्चिततेने प्रेरित झाले होते. गोव्यात 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ श्रेणी अंतर्गत डिस्टंझ (डिस्टन्स ) प्रदर्शित करण्यात आला . आज एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, दिग्दर्शक लार्स नॉर्न म्हणाले "आपल्या सभोवतालची भीती आणि बदलांच्या पार्श्वभूमीवर पुढे जाण्याची मानवी गरज शोधण्याचा मी प्रयत्न केला".
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Distanz-1GPY3.jpg)
या चित्रपटाची कथा लाझलोच्या जीवनाभोवती फिरते , ज्याने महामारीच्या काळात स्वत: ला सर्वांपासून विलग ठेवले. जागतिक महामारीमुळे लॉकडाऊन सुरु असताना या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. कलाकार आणि क्रू यांना सर्व सामाजिक प्रोटोकॉलचे पालन करावे लागले तसेच महामारीमुळे लादलेल्या निर्बंधांचे पालन करावे लागले. “मनातल्या भावना बाहेर आणण्यासाठी चित्रपट शक्य तितका वास्तववादी आणि अस्सल दिसावा अशी माझी इच्छा होती. कलाकारांना मास्क घालून चित्रीकरण करावे लागले जेव्हा माझे सिनेसृष्टीतील सहकारी मास्क घातलेल्या लोकांचे चित्रीकरण करण्यापासून दूर जात होते.
मात्र, हा महामारीवरचा चित्रपट नाही, असे दिग्दर्शकाने स्पष्ट केले. “महामारी ही समस्या नव्हती, मात्र आपल्या आतमध्ये असलेल्या सर्व समस्या पुढे आणण्यासाठी ती उत्प्रेरक ठरली . लाझलो हे पात्र स्वतःचे संरक्षण करताना दिसत आहे, झो एखाद्या समस्या किंवा विषाणूप्रमाणे घरात प्रवेश करतो आणि एक विनाशकारी शक्ती बनतो ”, असे त्यांनी सांगितले.
लार्स नॉर्न म्हणाले , “महामारी हा मानवतेसाठी जीवन बदलून टाकणारा क्षण होता. हे कुठेतरी चित्रपटात मांडणे हे आपले कर्तव्य आहे. एक संगीतकार, छायाचित्रकार, लेखक किंवा चित्रपट निर्माता म्हणून, असे वाटले की एखाद्याच्या कामात महामारीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. ”
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Distanz-2GS4G.jpg)
लार्स नॉर म्हणाले, “मला अपार्टमेंट एक पात्र म्हणून दाखवायचे होते, ज्यामध्ये प्रत्येक खोलीचा स्वतःचा आवाज आणि टोन असेल. ”.डिस्टंझ बदलाची भीती देखील दाखवते. "जर तुम्हाला बदलायचे असेल तर तुम्हाला ती भीती काढून टाकावी लागेल",असे लार्स नॉर्न म्हणाले. त्याला एका अपार्टमेंटमधील दोघांची गोष्ट सांगायची होती. "स्वत:ला सुसंस्कृत बनवण्यासाठी काहीवेळा तुम्हाला स्वतःला नष्ट करावे लागते" या वस्तुस्थितीचे प्रतिबिंब हा चित्रपट दाखवतो असे ते म्हणले.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Distanz-3H8NC.jpg)
निर्माता फेलिक्स लीबर्गने याला 'काळाचा दस्तावेज ' म्हटले आहे , जो लॉकडाउनशिवाय होऊ शकला नसता . लॉकडाऊनमध्येच चित्रपटाचे पूर्ण चित्रीकरण झाले. "हा काळाचा तुकडा आहे, इतिहासातील एक क्षण, जो आम्हाला सर्जनशील पद्धतीने टिपायचा होता",असे ते म्हणाले. भारतीय समाजाविषयी बोलताना त्यांनी सांगितले, "इथला इतिहास आणि संस्कृती अधिक जोडणारी, सामायिक करणारी, दयाळू आणि प्रेमळ आहे".
महामारीच्या काळात चित्रपटाच्या चित्रीकरणात उदभवलेल्या आव्हानांबद्दल विचारले असता, हॅना एहरलिचमन आणि लुकास इंग्लंडर या दोन्ही अभिनेत्यांनी सांगितले की संसर्ग होण्याची भीती असली तरी, विलग राहणे आणि क्रूसह बबलमध्ये राहिल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटले. हन्ना पुढे म्हणाली की तिच्या व्यक्तिरेखेमध्ये शिरल्यामुळे तिला स्वतःची एक कणखर बाजू गवसली.
हॅना एहरलिचमन म्हणाली, "चित्रपटाचा काही भाग तुमच्या भावनांना घाबरून जाण्याचा आणि तुमच्या भावनांबद्दल बोलण्याचा जर्मन मार्ग दाखवतो". की "आम्ही एका संक्रमणातून जात होतो आणि आमचे प्रश्न आणि मानसिक समस्यांबद्दल बोलायला लागलो होतो आणि स्वतः कसे असावे हे आम्हाला माहित नव्हते" असे अभिनेता लुकास इंग्लंडरने या चित्रपटाचे वर्णन केले आहे.
सतत वाढत जाणारे सामाजिक निर्बंध आणि गुंतागुंत यातून मुक्त होण्याच्या आसक्तीचे वर्णन हा चित्रपट करतो. "डिस्टंझ " हे आजच्या आपल्या समाजाचे प्रतिबिंब आहे. लाझलो आणि झो नुकसान , तणाव, अहंकार, भीती, लिंग आणि प्रेम यांच्या परिणामांबाबत तडजोड करतात. लॉक-डाउन दरम्यान डिस्टंझ लिहिले गेले होते, फक्त एका अपार्टमेंटमध्ये चित्रित केले गेले आणि पूर्णपणे स्वतंत्रपणे निर्मिती केली गेली . एक आधुनिक नाट्य जे मानवी आत्म्यामध्ये खोलवर जाते आणि ओळखीचे प्रश्न सोडवते आणि जीवनाचा पट उलगडते.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![](http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Twitter-iconI0HR.jpg)
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878403)
Visitor Counter : 248