माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आनंदाच्या भूमीतील स्वप्ने
गोवा/मुंबई, 23 नोव्हेंबर 2022
कोस्टारिका हा देश जगातल्या सर्वाधिक आनंदी देशांपैकी एक मानला जातो. साध्या-सोप्या गोष्टींमध्ये आनंद मानणारा हा देश प्रत्येक क्षण भरभरुन जगण्यावर विश्वास ठेवतो. आणि म्हणूनच, अशा आनंदी, उत्साही देशाला मनोरंजनाचं केंद्र असलेल्या चित्रपटांचं आकर्षण असणं स्वाभाविकच आहे. कोस्टा रिकाचे चित्रपटविश्व म्हणजे रंगीबेरंगी चित्रपटांचा सुंदर कॅनव्हास असतो आणि दरवर्षी हा कॅनव्हास अधिकाधिक सुंदर होत जातो.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/dream-103H8.jpg)
Still from the movie I have Electric Dreams.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/dream-25OJ1.jpg)
Still from the movie Domingo and the mist
ह्यावर्षी 53 व्या इफ्फी मध्ये कोस्टारिकाचे दोन चित्रपट दाखवले जाणार आहे. त्यातला एक गोल्डन पिकॉक स्पर्धेत असलेला व्हेलेन्टीना मौरेल दिग्दर्शित 'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स( 2022)' हा चित्रपट आहे. हा चित्रपट इव्हा या आपल्या आईसोबत राहणाऱ्या सोळा वर्षांच्या मुलीच्या आयुष्याभोवती फिरतो. पौंगडावस्थेत असलेल्या इव्हाची कोवळी स्वप्ने आणि बाहेरचं निष्ठुर जग यांच्यातला संघर्ष या चित्रपटात प्रभावीपणे मांडला आहे. इव्हा आणि तिच्या वडलांमधले प्रेम- राग अशा परस्परविरोधी भावनांची गुंतागुंत असलेले नातेसंबंध या चित्रपटात ज्या प्रभावीपणे दाखवण्यात आले आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना अक्षरशः रोलर कोस्टरमध्ये बसल्यासारखा अनुभव मिळतो.हेच या चित्रपटाचे बलस्थान आहे.
त्याशिवाय, या महोत्सवात डोमिंगो अँड द मिस्ट( 2022) या चित्रपटही दाखवला जाणार आहे. यातला नायक डोमिंगो त्याच्या घरावर आलेल्या जप्तीविरोधात लढा देतो. डोमिंगोच्या मालमत्तेत एक रहस्य दडलेले आहे. त्याच्या आधीच्या पत्नीचे भूत त्याला भेटते. आपला प्रदेश न सोडण्याचा डोमिंगोचा निश्चय या सिनेमातून व्यक्त होतो.
गोव्यात 20 ते 28 पर्यंत सुरु असलेल्या या चित्रपट महोत्सवातल्या कोस्टारिकाच्या चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी आपण सज्ज आहात ना ?
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878333)
Visitor Counter : 218