युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मध्य आशियाई देशांतील युवा शिष्टमंडळाशी साधला संवाद

Posted On: 22 NOV 2022 10:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2022

मध्य आशियाई देशांतील 100 सदस्यीय युवा शिष्टमंडळ  सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहे.  युवा व्यवहार विभागाने आयोजित केलेल्या या दौऱ्याची सुरुवात 17 पासून झाली. 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत हे शिष्टमंडळ भारतात असेल. त्यांच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्ली येथे युवा शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते.

अनुराग ठाकूर यांनी भोजनसमयी संवाद साधला. या आंतरराष्ट्रीय युवा देवाणघेवाण कार्यक्रमात 4 मध्य आशियाई देशांचे प्रतिनिधी एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे सद्भावना आणि निकोप संबंधांना चालना मिळण्यासाठी मदत होईल, असे ठाकूर यावेळी म्हणाले. त्यांनी युवा प्रतिनिधींच्या कामगिरीचे कौतुक केले. मध्य आशियात भारतीय चित्रपटांचा पडलेला मोठा प्रभाव आपण स्पष्टपणे पाहू शकतो. आपण जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशात असलो तरी आपल्यात बर्‍याच गोष्टी समान आहेत, असे ते म्हणाले. तरुण हे देशाचे सर्वात महत्त्वाचे भागधारक आहेत असेही त्यांनी सांगितले.

भारत भेटीदरम्यान या प्रतिनिधींनी दिल्लीतील प्रधान मंत्री संग्रहालयाला, युद्ध स्मारकाला तसेच मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल, फिल्म सिटी, गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याची संधीही या शिष्टमंडळाला मिळाली. मध्य आशियातील शिष्टमंडळाने परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशीही संवाद साधला.

 

 

 

 

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1878152) Visitor Counter : 156


Read this release in: English , Urdu , Hindi