सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी मागास तसेच आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये 600 मधुमक्षिका-पालन पेट्यांचे केले वितरण

Posted On: 22 NOV 2022 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2022

मध-अभियान’या महत्वाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देऊन केव्हीआयसी अर्थात खादी व ग्रामोद्योग आयोगाने आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे.  आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील 30 लाभार्थ्यांना 300 मधुमक्षिका पालन पेट्या, छत्तीसगड मधील बडेकिलेपाल, तुरंगपूर आणि बस्तर या जिल्ह्यांतील 20 लाभार्थ्यांना 200 मधुमक्षिका पालन पेट्या तर मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील 10 लाभार्थ्यांना 100 मधुमक्षिका पालन पेट्या वितरीत केल्या. मध अभियाना अंतर्गत बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. 

 पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर  भारत घडविण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत, खादी व ग्रामोद्योग आयोगाने या उपक्रमासाठी देशातील काही मागास तसेच आदिवासी बहुल जिल्हे निवडले आणि लाभार्थ्यांना एकूण 600 मधुमक्षिका पालन पेट्यांचे वितरण करून त्यांना 5 दिवसांचे प्रशिक्षण तसेच मधमाशा पाळण्यासाठी आवश्यक असणारी इतर साधने देखील पुरविली. यावेळी आयोगाच्या सक्षम अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांना मधाच्या विपणनासाठी योग्य मंच उपलब्ध करून देण्यासंदर्भात केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी मार्गदर्शक सूचना केल्या.

6 स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांनी देशाच्या संवेदनशील आणि दुर्गम भागात केलेल्या कामाची अध्यक्षांनी प्रशंसा केली.या महिला लाभार्थ्यांना जास्तीतजास्त प्रकारे पाठबळ पुरविण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली. आजच्या संवादादरम्यान लाभार्थ्यांनी उपस्थित केलेल्या सर्व समस्या  सोडवण्याचे आश्वासनही  त्यांनी दिले.

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1878136) Visitor Counter : 202


Read this release in: English , Urdu , Hindi