माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पालोमा ते पॅसिफिक्शन: पोर्तुगिज चित्रपट निर्मितीतील बारकाव्यांचा उत्सव
गोवा/मुंबई, 22 नोव्हेंबर 2022
“उन्हाळ्यातील एका भयंकर गरमीच्या दिवशी पालोमा आपली खूप वर्षांपासूनची एक फँटसी पूर्ण करण्याचे ठरवते. ती फँटसी म्हणजे, तिचा प्रियकर झे सोबत चर्चमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह. ती पपईची लागवड करण्यासाठी शेतात राबराब राबते आणि एक आई म्हणूनही ती अतिशय उत्तम असते. तिच्या कित्येक वर्षांपासूनच्या या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी, तिने खूप काळापासून पैसे साठवून ठेवले असतात. मात्र, त्या चर्चमधले पाद्री तिचा विवाह विधी करण्यास नकार देतात, त्यामुळे तिचे हे स्वप्न प्रत्यक्षात काही उतरू शकत नाही. या धक्क्यामुळे, पालोमा ह्या तृतीयपंथी स्त्रीला अपमानित वाटतं. आपल्यावर अन्याय झाल्याची, आपली फसवणूक केल्याची भावना तिच्या मनात दाटून येते. मात्र, असे असले तरी तिची निष्ठा आणि निश्चय ढळलेला नसतो...”
कथाविश्वात रमलेल्या चित्रपटांचा देश, पोर्तुगाल, 53 व्या इफ्फीमध्ये ही पालोमाची कथा घेऊन आला आहे. हा चित्रपट, महोत्सवाच्या आयसीएफटी-यूनेस्कोच्या गांधी पदक श्रेणीच्या स्पर्धेत आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/paloma-1VU3G.jpg)
मार्सेलो गोम्स दिग्दर्शित पालोमा (2022) चित्रपटातील दृश्य
53 व्याइफ्फी मध्ये, मार्को मार्टिन्स दिग्दर्शित ग्रेट यार्माउथ (2022) आणि अल्बर्ट सेरा दिग्दर्शित पॅसिफिक्शन (2022) हे इतर पोर्तुगीज चित्रपट रसिकांना बघता येतील.
थेट 1896 पासूनचा इतिहास, ते अनेक दिग्गजांच्या नावांचा दारुगोळा, आपल्या तोफखान्यात सामावलेला पोर्तुगीज चित्रपटसृष्टिचा इतिहास, सर्व चित्रपट रसिकांसाठी अतिशय मनोरंजक असा आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/paloma-2LTUF.jpg)
Still from the movie Great Yarmouth: Provisional Figures
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/paloma-3Y7WL.jpg)
Still from the movie Pacifiction
लुमिएर बंधूंनी चलचित्रांचा शोध लावत, नवा इतिहास रचल्यानंतर केवळ सहाच महिन्यांनी, म्हणजे 18 जून 1896 रोजी, पोर्तुगालमधील लिस्बन सिनेमाचा, रिअल कोलिसेयू दा रुआ दा पाल्मा येथे जन्म झाला. पोर्तुगालचा पहिला बोलपट, ए सेव्हेरा 1931 साली तयार करण्यात आला. त्यानंतर लगेचच, म्हणजे 1933 पासून पोर्तुगीज चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरु झाला. त्याची सुरुवात ‘ए कॅनको दे लिसबोआ’पासून झाली तर, पुढची 20 वर्षे, ओ पतियो दास कँटिगॅस (1942) आणि ए मेनिना दा राडिओ (1944). सारखे उत्तमोत्तम सिनेमा तिथे निर्माण झाले. पोर्तुगीज सिनेमाचा कॅनव्हास इतका व्यापक आहे, की मॅनोएल दे ऑलिव्हिएरा चा पहिला चित्रपट आनिकि बोबो (1942) मध्ये, चित्रित करण्यात आलेली वास्तववादी सौन्दर्य मांडणारी व्यक्तिरेखा, इटलीमधल्या बहुचर्चित, नव-वास्तववादी सिनेमाच्या एक वर्ष आधीच निर्माण झाली होती.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878101)
Visitor Counter : 199