माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

'ब्युटीफूल बीइंग्स्'- मैत्रीतील आनंद आणि मर्यादा यांच्याविषयीची एक मर्मभेदी कथा


“आज अनेक लोक वास्तव जगात इतके गुरफटले आहेत, की त्यांची स्वप्ने जोपासत पुढे घेऊन जाणे त्यांना शक्यच होत नाही”- निर्माता अँटोन मानी स्वान्झन

गोवा/मुंबई, 22 नोव्‍हेंबर 2022

 

'ब्युटीफूल बीइंग्स्' हा चित्रपट म्हणजे, आजचा युवा या जगाकडे कोणत्या दृष्टीने बघतो, हे चित्रित करण्याचा एक प्रयत्न आहे. ही एक थेट, मर्मभेदी कथा आहे ज्यात, मैत्रीतील आनंद आणि त्याच्या मर्यादा, या दोन्हीचा सूक्ष्म शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या इफ्फीदरम्यान,पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या 'टेबल टॉक’ या संवादात्मक कार्यक्रमात पत्रकार आणि महोत्सवातील प्रतिनिधींशी संवाद साधतांना, या आईसलँडच्या चित्रपटाचे निर्माते, अँटोन मानी स्वान्झेन यांनी हे मत व्यक्त केले. या महोत्सवाच्या ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ या विभागात हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

“आमचा चित्रपट जारी, वास्तव परिस्थिती आणि खऱ्या कथानकावर आधारलेला असला, तरीही त्यात, आम्ही असं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे की यातून काय फळ मिळेल यांचा विचार करतांना इतरांना मदत केल्यामुळेच आपल्याला खरा आनंद मिळतो, असे अँटोन मानी स्वान्झन यांनी सांगितले. 

“माझे दिग्दर्शक,गौमुंडूर अरनार गुमुंडसन यांनी ही कल्पना मांडत, आपण असा वेगळ्या आणि संवेदनशील विषयावर वेगळ्या पद्धतीने चित्रपट काढू”, अशी आयडिया मला सांगितली, अशी माहीती त्यांनी पुढे दिली.   

ब्युटीफूल बीइंग्ज्  ही आदि या मुलांची कथा उलगडत जाणारा चित्रपट आहे. आदिची जडणघडण, एका कणखर आईच्या नजरेखाली झालेली असते. आदि स्वतःला बाहेरच्या जगापासून अलिप्त, एकटे राहण्याचा निर्णय घेतो. या मित्रांच्या स्वतःला जाणून घेण्याच्या प्रवासात, ही मुले स्वतःचा सांभाळ स्वतःच करायला शिकतात. आक्रमकता आणि हिंसेशी जसा या मुलांचा परिचय होतो, तशीच निष्ठा आणि प्रेम या भावनांशीही त्यांची ओळख होते.  

“एकही मित्र नसण्यापेक्षा काही वाईट मित्र असण्यामधला मानसिक संघर्ष आणि परस्परांविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेतून निर्माण होणारा एक नैसर्गिक मानवी बंध” या कथानकात महत्वाचे ठरतात. ही मुले जरी हिंसात्मक कृत्यात सहभागी झाली तरी, त्यांच्या मनात त्याविषयी भीती असते, मात्र भावनेच्या या फांदीवर, त्यांना प्रेम आणि निष्ठा अशा भावनाही जाणवतात,” असे अँटोन स्वान्झन यांनी सांगितले. “या चित्रपटात, कोणत्याही नात्यांमधील एकमेकांच्या मर्यादांचा कसा आदर ठेवायचा यावरही भाष्य केले आहे.’

आपले हे स्वप्न ह्या मंचावर सादर करण्याची संधी इफ्फीने दिल्याबद्दल त्यांनी इफ्फीच्या आयोजकांचे आभार मानले.तसेच, चित्रपट रसिकांशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची संधी दिल्याबद्दलही अँटोनने आनंद व्यक्त केला.

‘ब्युटीफूल बीइंग्ज्’ चा वर्ल्ड प्रीमियर शो बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला होता.

 

चित्रपटाविषयी माहिती:

दिग्दर्शन आणि पटकथा लेखन: गौमुंडूर अरनार गुमुंडसन

निर्माते: अँटोन मानी स्वान्झन

प्रसिद्धी विभागप्रमुख : स्टूरला ब्रॅंडथ ग्रोव्हलेन

संकलक :  आंद्री स्टीन गुजॉनसन आणि अँडर स्कोव्ह

कलाकार:

बिरगीर डागूर बजारकासन, आस्केल आयनार पॅल्मासन, व्हिक्टर बेनोनी बेनेडिक्ट्सन, अनीता ब्रीम, इस्गेऔर गुनायरदोतीर, ओलाफ दारी ओलाफसान

 

कथासार :

आदिची जडणघडण, एका कणखर आईच्या नजरेखाली झालेली असते. आदि स्वतःला बाहेरच्या जगापासून अलिप्त, एकटे राहण्याचा निर्णय घेतो. या मित्रांच्या स्वतःला जाणून घेण्याच्या प्रवासात, ही मुले स्वतःचा सांभाळ स्वतःच करायला शिकतात. आक्रमकता आणि हिंसेशी जसा या मुलांचा परिचय होतो, तशीच निष्ठा आणि प्रेम या भावनांशीही त्यांची ओळख होते.  त्यांच्या वागणुकीतून काही धोकादायक परिस्थिती निर्माण होते, मात्र, त्याचवेळी, आदिला स्वप्नासारखी दृश्‍यांची मालिका दिसू लागते.  हे नव्याने जाणवलेले अंतर्ज्ञान त्याला आणि त्याच्या मित्रांना पुन्हा सुरक्षित मार्गावर येण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल किंवा ते हिंसेच्या मार्गावर पुढे जातील?

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1878073) Visitor Counter : 235


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil