दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्राय ने प्रसारण आणि केबल सेवांसाठी नियामक चौकटीत सुधारणा अधिसूचित केल्या

Posted On: 22 NOV 2022 4:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2022

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने आज दूरसंचार प्रसारण आणि केबल सेवा (आठवा) (अ‍ॅड्रेसेबल सिस्टीम्स) दरपत्रक-टेरीफ (तृतीय दुरुस्ती) आदेश, 2022 (2022 चा 4) आणि दूरसंचार प्रसारण आणि केबल सेवा इंटरकनेक्शन (अॅड्रेसेबल सिस्टीम्स) (चौथी दुरुस्ती) नियमन, 2022 (2022 पैकी 2) जारी केला आहे.

प्राधिकरणाने भागधारकांची मते विचारात  घेतली आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी टेरिफ ऑर्डर 2017 आणि इंटरकनेक्शन रेग्युलेशन्स 2017 मध्ये सुधारणा अधिसूचित केल्या.

सर्व प्रसारणकर्त्यांनी 16 डिसेंबर 2022 पर्यंत चॅनेलचे नाव, स्वरूप, भाषा, वाहिन्यांची दर महिन्याला असलेली कमाल किरकोळ किंमत (एमआरपी), चॅनेल्सच्या रचना आणि चॅनेल संख्येच्या समूहांच्या एमआरपीमधील कोणताही बदल प्राधिकरणाला कळवावा आणि त्याच वेळी अशी माहिती त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.

नवीन नियामक चौकट 2020 चे पालन करत ज्या प्रसारणकर्त्यांनी आधीच त्यांच्या रेफरन्स इंटरकनेक्शन ऑफर( आरआयओ) सादर केल्या आहेत ते 16 डिसेंबर 2022 पर्यंत त्यांच्या आरआयओ मध्ये सुधारणा करू शकतात.

सदस्यांनी निवडलेले चॅनेल समूह किंवा चॅनेलनुसार 1 फेब्रुवारी 2023 पासून त्यांना सेवा पुरवण्याची जबाबदारी टेलिव्हिजन चॅनेलच्या सर्व वितरकांची असेल.

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1878021) Visitor Counter : 193


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Telugu