गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यात रोजगार मेळाव्या अंतर्गत एका कार्यक्रमात 64 जणांना केन्द्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

प्रविष्टि तिथि: 22 NOV 2022 4:28PM by PIB Mumbai

पणजी, 22 नोव्हेंबर 2022

रोजगार मेळाव्या अंतर्गत, नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचा दुसरा टप्पा जारी केला. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गोव्यातील 64 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. गोव्यातील मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या सीआयएसएफ युनिट, ऑफिस ऑफ कमांडंट यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सीआयएसएफचे कमांडंट रणजितकुमार साहनी, एमपीएचे उपाध्यक्ष  गुरुप्रसाद राय यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय सशस्त्र दलात नव्याने भर्ती झालेल्या 64 जणांना केंद्रीय मंत्र्यांनी नियुक्ती पत्रे दिली.

रोजगार मेळावा हे, रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेच्या  दिशेने टाकलेले पाऊल आहे. रोजगार मेळावा, भविष्यात रोजगार निर्मिती आणि तरुणांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे असे नवनियुक्तांना संबोधित करताना श्रीपाद नाईक म्हणाले.

याआधी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या 75 हजार जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. विविध केंद्रीय सशस्त्र दलांमध्ये गृह मंत्रालयाकडून मोठ्या संख्येने पदे भरली जात आहेत, असेही नाईक यांनी सांगितले.

विविध सरकारी विभागांमधील सर्व नवीन नियुक्त्यांसाठी ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम सुरु केला आहे. भर्ती मोहिमेचा तो एक भाग आहे. हा अभ्यासक्रम जीवनात प्रगती साधण्यास उमेदवारांना मदत करेल.  त्यांना त्यांचे ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता वाढवण्यासाठी igotkarmayogi.gov.in मंचावर इतर अभ्यासक्रम जाणून घेण्याची संधी देखील मिळेल असे नाईक यांनी सांगितले.

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1878002) आगंतुक पटल : 261
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Tamil