माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘उद्याची 75 सृजनशील व्यक्तिमत्वे’ यांच्या साठी ‘53 तासांचे आव्हान’ या उपक्रमाची केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते सुरुवात
‘उद्याची 75 सृजनशील व्यक्तिमत्वे’ या उपक्रमात India@100 या संकल्पनेवर आधारित लघुपटांच्या माध्यमातून आपल्या गुणवत्तेचे प्रदर्शन करतील
गोवा/मुंबई, 21 नोव्हेंबर 2022
“उद्याची 75 सृजनशील व्यक्तिमत्वे’ हा कार्यक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या, युवकांना शिकण्याची आणि विकसित होण्याची संधी मिळायला हवी, या दूरदृष्टीवर आधारित आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केले आहे. ‘उद्याची 75 सृजनशील व्यक्तिमत्वे’’यांच्यासाठी ‘53 तासांचे आव्हान’ या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शॉर्ट्स टीव्हीचा हा उपक्रम, 53 तासांचे आव्हान, ही ‘सृजनशील व्यक्तीमत्वाना’ कमीतकमी वेळात आपली कला दाखविण्याची एक संधी देणारा आहे.
53व्या इफ्फी दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या ‘53 तासांचे आव्हान’ या उपक्रमाचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. या स्पर्धेत 75 ‘सृजनशील व्यक्तीमत्वांना’ त्यांच्या India@100 या संकल्पनेवर आधारित लघुपट 53 तासांत निर्माण करण्याचे आव्हान दिले जाईल. इफ्फिच्या या विभागाचे प्रायोजक राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि शॉर्ट्स टीव्ही आहेत. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र आणि इतर मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. एक हजाराहून अधिक युवा कलावंतांमधून निवडण्यात आलेल्या सृजनशील ‘सृजनशील व्यक्तीमत्वां’ चे अभिनंदन करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “आपण आपल्या आयुष्यात एक नवीन प्रवास सुरु करत आहात, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ घेत असलेले आमचे मास्टर क्लासेस तुम्हाला भरारी घेण्यास मदत करतील.”
75 तरुणांना एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी, त्यांची प्रतिभा निखारण्यासाठी, सर्वोत्कृष्ट गोष्टींमधून शिकण्यासाठी आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी हे व्यासपीठ आहे असे ते पुढे म्हणाले.
'75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' या उपक्रमाच्या प्रवासाविषयी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गेल्या वर्षी हा प्रवास सुरू झाला. या अंतर्गत आपल्या युवकांना सहभागी करून ,त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या क्षमतांची चाचपणी करण्यासाठी इफ्फीमध्ये एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो'ची ही दुसरी आवृत्ती आहे आणि चित्रपट, सर्जनशीलता आणि संस्कृतीची आवड असलेल्या 150 कणखर युवकांचा गट आम्ही तयार केला आहे असे ते म्हणाले.
गेल्या वर्षीच्या '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो'च्या विजेत्यांच्या चित्रपट आणि ओटीटी शोमधील योगदानाचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, हे प्रतिभावंत तरुण भारतीय चित्रपट आणि चित्रपट उद्योगाच्या भविष्यात विशेषत: अमृत काळाच्या पुढील 25 वर्षांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतील.
चित्रपट उद्योग सर्जनशील प्रयोग करणारा म्हणून ओळखला जातो , मात्र आपण त्याकडे एक सर्जनशील अर्थव्यवस्था म्हणून देखील पाहिले पाहिजे, ते सुप्त शक्तीचे एक रूप आहे आणि त्याद्वारेच राष्ट्रांची ओळख निर्माण होते. भारतासाठी, इफ्फी हे भारतीय सिनेमाला भारतीय सॉफ्ट पॉवर बनवण्याच्या दिशेने बदल घडवून आणणारे एक व्यासपीठ देखील आहे .नाहीतर, इतक्या आंतरराष्ट्रीय चेहऱ्यांना इफ्फीचा भाग बनवणे इतके सोपे नाही.
हजारो अर्जांमधून सर्वोत्तम निवडण्यासाठी परीक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचीही केंद्रीय मंत्र्यांनी दखल घेतली.
* * *
PIB Mumbai | Jaydevi PS/Radhika/Sushama/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877743)
Visitor Counter : 220