माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सिनेमा जगण्याचा अनुभव, इफ्फी महोत्सव
गोवा/मुंबई, 19 नोव्हेंबर 2022
गोवा राज्याच्या सागर तटावर सिनेमा महोत्सवाच्या लाटा उसळत आहेत. होय, हीच वेळ आहे पोहण्याची, चित्रपटांच्या, कलेच्या, जीवनाच्या चिरंतन सोहळ्यात बुडून जाण्याची. इफ्फी, 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, उद्यापासून सुरू होत आहे, जो चित्रपट व्यावसायिक आणि उदयोन्मुख चित्रपट प्रेमींना नऊ दिवस कलात्मक प्रेरणा आणि उत्सवाचं आश्वासन देत आहे.
आशियातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या 53 व्या इफ्फी महोत्सवाची सुरुवात, ऑस्ट्रियन दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या अल्मा आणि ऑस्कर या चित्रपटांनी होणार आहे.
सालाबादप्रमाणे, महोत्सवाचा उद्घाटन सोहळा गोव्यामध्ये पणजी इथल्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. मृणाल तखूर, वरुण धवन, कॅथरीन तेरेसा, सारा अली खान, कार्तिक आर्यन आणि अमृता खानविलकर हे चित्रपट क्षेत्रातील कलाकार महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन हे देखील उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या भावनेला अनुसरून, उद्घाटन सोहळ्याची संकल्पना, "गेल्या 100 वर्षांतील भारतीय चित्रपटाच्या प्रगतीचे टप्पे" ही आहे.
डायटर बर्नर दिग्दर्शित अल्मा आणि ऑस्कर या ऑस्ट्रियन चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
चित्रपटाच्या उद्घाटनासाठीचा रेड कार्पेट (लाल गालीचा) समारंभ दुपारी 2.00 वाजता INOX-I, पणजीम येथे सुरू होईल, त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन होईल. Krzysztof Zanussi's Perfect Number या पोलिश चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता INOX-I, पणजीम येथे समारोपाच्या चित्रपटाचा रेड कार्पेट समारंभ सुरू होईल, त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन होईल.
'इंडियन पॅनोरामा' मध्ये भारतातील 25 फीचर फिल्म्स आणि 19 बिगर-फीचर फिल्म्स दाखवल्या जातील तर 183 चित्रपट आंतरराष्ट्रीय सादरीकरणाचा भाग असतील.
महोत्सवात, स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्याची मुलगी अॅना सौरा उद्घाटन समारंभात त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारेल.
महोत्सवात, फ्रान्स हा ‘स्पॉटलाइट’ देश असून कंट्री फोकस पॅकेज अंतर्गत 8 फ्रेंच चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
‘होमेज (श्रद्धांजली)’ विभागात पंधरा भारतीय आणि पाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश असेल. भारतरत्न लता मंगेशकर, गायक-संगीतकार बप्पी लाहिरी, कथ्थक उस्ताद पंडित बिरजू महाराज, रमेश देव आणि महेश्वरी अम्मा हे अभिनेते, गायक केके, दिग्दर्शक तरुण, आसामी अभिनेता निपॉन दास , नाट्य कलाकार मजुमदार आणि गायक भूपिंदर सिंग यांना आदरांजली वाहिली जाईल.
* * *
PIB Mumbai | S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1877384)
Visitor Counter : 214