गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
सर्व शहरी भागातल्या सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांची स्थिती सुधारण्यासाठी भव्य मोहीम सुरू करण्यात आली
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जागतिक शौचालय दिन 2022 च्या निमित्ताने शौचालय 2.0 मोहीम सुरू केली
Posted On:
19 NOV 2022 6:28PM by PIB Mumbai
बेंगळुरू, कर्नाटक येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जागतिक शौचालय दिन 2022 निमित्त आज टॉयलेट 2.0 मोहिमेचा शुभारंभ केला. नागरिक आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकत्रित सहकार्याने देशातल्या नागरी भागातल्या सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांचा चेहरा मोहरा बदलणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. शौचालये 2.0 मोहिमेचा शुभारंभ करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “भारत हागणदारी मुक्त मानसिकतेच्या पलिकडे जाण्यासाठी सज्ज आहे. स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि सार्वजनिक जागामुळे जनतेला उत्तम राहणीमानाचा अनुभव मिळेल. आणि म्हणूनच शौचालये 2.0 मोहीम "2" सुरू करताना मला आनंद होत आहे. या मोहीमेला यशस्वी करण्यासाठी सर्व भागधारक एकत्रितपणे काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटन सत्राला संबोधित करताना,केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव, मनोज जोशी यांनी उपस्थितांना आठवण करून दिली की, स्वच्छतेचा प्रवास हा निरंतर चालणारा असतो आणि त्यासाठी संस्थात्मक उपाययोजना आवश्यक असतात. मानवी कचऱ्याची योग्य आणी सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जाणे सुनिश्चित करण्यासाठी शहरांसाठी ODF++ प्रोटोकॉल आणि प्रमाणपत्र दिले जाते. आपल्या देशातल्या 25% शहरांनी आधीच हा दर्जा प्राप्त केला आहे.
जागतिक शौचालय दिन कार्यक्रमापूर्वी तीन दिवसांच्या विस्तृत क्षमता विकास कार्यशाळा घेण्यात आल्या. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने वॉश (WASH) संस्थेच्या सहकार्याने 16 ते 18 नोव्हेंबर 2022 दरम्यान कर्नाटकातल्या बेंगळुरू येथे, 3-दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती जेणेकरुन राज्यांना सांडपाण्याचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी निश्चित वेळेत सज्ज करता येईल.
***
S.Kane/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877312)
Visitor Counter : 207