माहिती आणि प्रसारण मंत्रालय

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 53व्या इफ्फी आणि त्याच्या भव्य यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

Posted On: 19 NOV 2022 1:35PM by PIB Mumbai

 

जागतिक चित्रपट समुदायामध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे(इफ्फी) महत्त्व अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की यामुळे चित्रपट लोकांना एकत्र आणत असल्याची भावना अधिक बळकट होते. भिन्न संस्कृती आणि धर्म यामध्ये सेतू उभारण्यासाठी एक संवादाचे माध्यम म्हणून चित्रपट महत्त्वाचे असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. शांतता, सुसंवाद आणि राष्ट्रीयता, संस्कृती, धर्म आणि अशाच प्रकारच्या भेदांच्या सीमांपलीकडे जाऊन परस्पर सामंजस्याला चालना देण्यामध्ये चित्रपटांनी बजावलेल्या भूमिकेची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
हा महोत्सव जागतिक चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक, रसिक आणि प्रतिनिधींना चित्रपटासाठी असलेल्या त्यांच्या अतीव प्रेमाची जोपासना करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी एका छत्राखाली एकत्र आणतो.  
20 नोव्हेंबर 2022 रोजी गोव्यामध्ये तळेगाव येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये एका दिमाखदार सोहळ्यात उद्घाटनासाठी 53वा इफ्फी महोत्सव सज्ज झाला आहे.


***

JPS/SP/PK

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877241) Visitor Counter : 166


Read this release in: English , Urdu , Hindi