जलशक्ती मंत्रालय
जागतिक शौचालय दिन, 2022: 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपूर्ण भारतात ‘स्वच्छता दौड ’ आयोजित
Posted On:
18 NOV 2022 4:56PM by PIB Mumbai
जागतिक शौचालय दिनानिमित्त, जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपूर्ण भारतभर 'स्वच्छता दौड ' आयोजित केली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ग्रामपंचायत (जीपी) स्तरावर स्थानिक नायक, स्वच्छाग्रही, आशा कार्यकर्त्या, स्वयंसेवक, तरुण, शाळकरी मुले आणि स्थानिक लोककलाकार इत्यादींचा समावेश असलेली "स्वच्छता दौड " आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या दौडमध्ये सहभागी होण्यासाठी स्थानिक जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी/खेळाडू /नामांकित व्यक्ती /स्थानिक प्रभावशाली व्यक्ती यांनी या "दौड " ला हिरवा झेंडा दाखवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. "दौड " च्या सुरुवातीला सर्व सहभागींकडून 'स्वच्छतेची प्रतिज्ञा' घेणे; स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण ) टप्पा II चे बॅनर, भित्तीपत्रक, घोषवाक्य आणि इतर बाह्य माहिती ,शिक्षण ,संप्रेषण (आयईसी) साहित्याचे प्रदर्शन, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी आणि/किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणावरून "दौड " सुरू करणे आणि समाप्त करणे; अल्पोपाहार, वैद्यकीय संच , टी-शर्ट, सहभाग प्रमाणपत्राची तरतूद यासंदर्भातली काळजी ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे - हे सर्व घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखील कळविण्यात आले आहे .
• जागतिक शौचालय दिन, 2022 साजरा करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ग्रामपंचायत स्तरावर "स्वच्छता दौड " आयोजित केली आहे
• जागतिक शौचालय दिन, 2022 च्या निमित्ताने आयोजित ' स्वच्छता दौड' ला स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी/खेळाडू /नामवंत व्यक्ती /प्रभावशाली व्यक्ती हिरवा झेंडा दाखवतील
• शौचालयाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि स्वच्छतेची सोय नसलेल्या लोकांसाठी जनजागृती करण्यासाठी 2013 पासून दरवर्षी जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो
• 2022 ची ‘जागतिक शौचालय दिन’ ची संकल्पना आहे ‘मेकिंग द इनव्हीजिबल व्हीजिबल’
• जागतिक स्वच्छता संकटाचा सामना करण्यासाठी कृती अधोरेखित करण्यासाठीचा हा दिवस आहे
• स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) जगातील सर्वात मोठे आचरण परिवर्तन कार्यक्रम म्हणून मान्यता दिली आहे
• स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) 'जल चळवळीने ' ग्रामीण भारतातील लोकसंख्येचे जीवन बदलले आहे.
डीडीडब्ल्यूएसने एनआयसीसोबत स्वच्छता दौड उपक्रमांवर देखरेख ठेवण्यासाठी एक समर्पित ई-मॉड्युल विकसित केले आहे.राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश "दौड " च्या स्थानाविषयी माहिती अपलोड करतील, प्रतिष्ठित व्यक्ती या दौडला हिरवा झेंडा दाखवतील / सहभागी होतील, सहभागींची संख्या आणि "दौड " ची छायाचित्रे आणि जिल्ह्यांकडून कार्यक्रमाचे संक्षिप्त विवरण देखील प्राप्त झाले आहे ."दौड " बद्दल अधिसूचनेचा समावेश असणारी स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)आयइसी संप्रेषण सामग्रीची सॉफ्टकॉपी,क्यूआर कोडद्वारे राज्यांना प्रदान करण्यात आली आहे. जी 17 नोव्हेंबर 22 रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या प्रारंभिक व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सामायिक करण्यात आली आहे.----- जागतिक पातळीवर 2013 पासून दर वर्षी साजरा होणारा हा कार्यक्रम शौचालयांच्या व्यवस्थेचा उत्सव साजरा करतो आणि स्वच्छतेच्या सोयींपासून वंचित असणाऱ्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतो. “मेकिंग द इनव्हीजिबल व्हीजिबल’’ ही या कार्यक्रमाची या वर्षीची संकल्पना असून या कार्यक्रमाद्वारे अपुऱ्या स्वच्छता प्रणालीमुळे कशा प्रकारे नद्या, तलाव आणि मातीमध्ये मानवी विष्ठा पसरते आणि त्यातून भूगर्भातील जलस्त्रोत प्रदूषित होतात यावर संशोधन करण्यात येणार आहे. पाणी दूषित होण्याची प्रक्रिया जमिनीच्या आत खोलवर होत असल्यामुळे ही समस्या अदृश्य प्रकारची आहे. आजचा विशेष दिवस, जागतिक पातळीवरील स्वच्छताविषयक आपत्तीचे निवारण करण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देण्याचा आणि शाश्वत विकास ध्येय क्र.6.2 गाठण्याच्या दृष्टीने वर्ष 2030 पर्यंत प्रत्येकासाठी स्वच्छतेच्या तसेच पाणीपुरवठ्याच्या सोयीची तरतूद करण्याचा आहे. भारताने ऑक्टोबर 2019 मध्ये संपूर्ण देश ओडीएफ अर्थात हागणदारीमुक्त झाल्याचे उद्दिष्ट गाठून स्वच्छतेची सुरक्षित सोय उपलब्ध असण्याबाबतचे शाश्वत विकास ध्येय 6.2 यापूर्वीच साध्य केले असले तरीही देश आता ओडीएफ प्लसची पातळी गाठण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करत आहे.
ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाला वर्तणुकीत बदल घडवून आणणारा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून मान्यता मिळाली आहे. हा कार्यक्रम सर्वसामान्य लोकांच्या सहभागाचे- लोकचळवळीच्या प्रभावी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या कार्यक्रमाने सामाजिक लाभ, आर्थिक फायदे,पर्यावरणाची सुरक्षितता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महिलांची सुरक्षितता आणि सन्मान राखणे या संदर्भात ग्रामीण भारतातील जनतेच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले आहे. ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आरोग्यपूर्ण वर्तणुकीच्या या सशक्त पायावर तसेच ओडीएफ प्लस पातळी गाठण्यासाठी जनतेला माहिती देणे, शिक्षित करणे आणि त्याबरहुकूम कृती करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ‘स्वच्छता रन’ ही याच उद्देशाने सर्वसामान्य जनतेला सहभागी करून घेणारी कृती आहे. शौचालयांचा वापर, सुरक्षित स्वच्छतेच्या सोयी आणि ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला अनुसरून दृश्य स्वच्छता यांचे महत्त्व समजण्याच्या दृष्टीने जनतेत जागरूकता निर्माण करणे हा या ‘रन’ चा उद्देश आहे.
‘स्वच्छता रन’ आयोजित करण्यासाठी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्यात आलेले पत्र वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
‘Swachhta Run’ Being Organized Across Rural India On 19th November 2022
‘Swachhta Run’ Being Organized Across Rural India On 19th November 2022
***
S.Patil/S.Chavan/S.Chitnis/P.Kor
Follow us on social media: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1877188)
Visitor Counter : 514