इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

डिजिटल वैयक्तिक माहिती  संरक्षण विधेयक 2022 च्या मसुद्यावर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) मागवल्या सूचना


प्रकरणनिहाय अभिप्राय आणि सूचना 17 डिसेंबर 2022 पर्यंत सादर करणे अपेक्षित

Posted On: 18 NOV 2022 9:03PM by PIB Mumbai

 

डिजिटल वैयक्तिक माहिती आणि तिच्या गोपनीयतेच्या सुरक्षेबाबत विविध पैलूंवर , इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, विचारविनिमय करत असून, डिजिटल वैयक्तिक माहिती गोपनीयता संरक्षण विधेयक 2022 चा मसुदा तयार केला आहे.  नागरिकांची  वैयक्तिक माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार एकीकडे अबाधित राखून, सोबत कायदेशीर बाबी, तसच त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर बाबींसाठी त्यांची वैयक्तिक माहिती उपलब्ध करुन देता यावी अशाप्रकारे प्रक्रिया राबवता येण्याच्या उद्देशाने, हे विधेयक (कायदा) तयार करण्यात येत आहे.

विधेयकाचा मसुदा सहजपणे समजावा म्हणून तो तयार करताना, साधी-सरळ-सोपी भाषा वापरली आहे  आणि आणि मंत्रालयाच्या https://www.meity.gov.in/data-protection-framework  या संकेतस्थळावर हा मसुदा उपलब्ध आहे. सोबतच, मसुद्यातील तरतुदींचा संक्षिप्त आढावा घेऊन स्पष्टीकरण करणारी टिप्पणीही या संकेतस्थळावर वाचायला मिळेल.

डिजिटल वैयक्तिक माहिती गोपनीयता संरक्षण विधेयक 2022  एकीकडे नागरिकांना, डिजिटल नागरीक म्हणून त्यांचे हक्क आणि कर्तव्ये आखून देते, तर दुसरीकडे संकलीत माहितीचा कायदेशीर वापर करुन तिची विश्वासार्हता  जपण्याची  जबाबदारी निश्चित करते.  हे विधेयक, माहिती संवर्धन-उपयुक्तता आणि उपयोग प्रक्रियेच्या खालील तत्त्वांवर आधारित आहे:

भारतात डिजिटल वैयक्तिक माहिती सुरक्षेचं नियमन करण्यासाठी, हे विधेयक कायद्याची चौकट उपलब्ध करेल.  नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षितपणे जपण्याचा अधिकार तसच सामाजिक अधिकार अबाधित राखणे आणि कायदेशीर बाबींसाठी ही वैयक्तिक माहिती वापरण्याच्या दृष्टीने प्रक्रिया करण्याची आवश्यकता म्हणून हे विधेयक अस्तित्वात येईल.

या  विधेयकाच्या मसुद्यावर मंत्रालयाने जनतेकडून अभिप्राय आणि सूचना मागवल्या आहेत.  नागरिकांना आपले अभिप्राय आणि सूचना  निर्धास्तपणे  देता येण्यासाठी, तो मजकूर उघड केला जाणार नाही, तसेच तो सार्वजनिक केला जाणार नाही. एकंदर या प्रक्रियेची गोपनीयता आणि विश्वासार्हता अबाधित राखली जाईल.

विधेयकाच्या मसुद्यावर प्रकरणनिहाय अभिप्राय आणि सूचना 17 डिसेंबर 2022  पर्यंत, https://innovateindia.mygov.in/digital-data-protection/  वर सादर करता येतील.

***

S.Patil/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877182) Visitor Counter : 289


Read this release in: English , Urdu , Hindi