संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दलाने केले  20 व्या राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव मंडळाच्या बैठकीचे गुजरातमध्ये आयोजन

Posted On: 18 NOV 2022 4:48PM by PIB Mumbai

 

सागरी शोध आणि बचावासंदर्भातील (एम-एसएआर) वार्षिक बैठकांच्या अनुंषंगाने, भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) गुजरातमधील केवडीया येथे 18 नोव्हेंबर 2022 रोजी 20 व्या

राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव मंडळाच्या (एनएमएसएआर) बैठकीचे आयोजन केले.

आयसीजीचे महासंचालक आणि एनएमएसएआर मंडळाचे अध्यक्ष व्ही एस पठानिया सर्वोच्च स्तरीय बैठकीचे अध्यक्ष होते.

एम-एसएआर सेवा बळकट करण्यासाठी इतर भागधारक/संसाधन संस्थांच्या समन्वयाने आणि मंडळाच्या सहकार्याने आयसीजीने

केलेल्या विविध उपक्रमांवर त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रकाश टाकला. राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव आराखडा-2022 देखील त्यांनी यावेळी प्रकाशित केला.

सर्व सहभागी संस्था आणि भागधारकांसाठी एम-एसएआर प्रणालीच्या कार्यान्वयनाबाबत एकात्मिक आणि समन्वित दृष्टीकोन राखण्यासाठी हा आरखडा धोरणात्मक दस्तऐवज म्हणून काम करेल.

सागरी सुरक्षेच्या विविध मुद्द्यांवर चर्चा, धोरणात्मक आराखडा आणि जागरुकता कार्यक्रमांद्वारे एसएआर सेवा सुधारण्यासाठी काय करता येईल? यावर चर्चा झाली. याव्यतिरिक्त, आयजीसी, इस्रो, महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय आणि कर्नाटक राज्य मत्स्यव्यवसायातील तज्ञांनी तांत्रिक सादरीकरणे केली. त्यानंतर प्रमुख मुद्यांवर विचारमंथन सत्र आणि चर्चा झाली.

एनएमएसएआर मंडळात, विविध केंद्रीय मंत्रालये/संस्था, सशस्त्र दलांचे सदस्य, सर्व किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यामधील 31 सदस्य आहेत. धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा, मार्गदर्शक तत्त्वे आणि कार्यपद्धती तयार करण्यासाठी याबरोबरच राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव योजनेच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच भारतीय शोध आणि बचाव क्षेत्राच्या (आयएसआरआर) विशाल 4.6 दशलक्ष चौरस किमी मध्ये नाविक आणि मच्छिमारांना सेवा देण्यासंदर्भात एनएमएसएआर मंडळ दरवर्षी बैठक घेते.

***

S.Patil/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1877170)
Read this release in: English , Urdu , Hindi