माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्याकडून इफ्फी 53 मध्ये आलेल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत
“अनेक वर्षांपासून, इफ्फीने चित्रपटांतील उदयोन्मुख समकालीन प्रवाहांचा आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून समावेश केला आहे”
#IFFIWood, 18 नोव्हेंबर, 2022
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी गोव्यामध्ये 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2022 साठी उपस्थित राहणार असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. एका लेखी संदेशात केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे की, आमचा इतिहास, संस्कृती आणि प्रत्येकाच्या जीवनावर चित्रपटांचा विस्तारत जाणारा प्रभाव साजरा करणे हाच इफ्फीचा उद्देश आहे.
त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, 1952 पासून, इफ्फीने भारतीय चित्रपट उद्योगाला जागतिक आघाडीवर वैविध्यपूर्ण चित्रपटांच्या बोलीचे सादरीकरण करण्यासाठी महत्वपूर्ण असा बहुविध प्रकारचा मंच उपलब्ध करून दिला आहे. जगातील आघाडीचा चित्रपट निर्माता म्हणून, भारताने सर्जनशील उद्योगाचे उर्जाकेंद्र म्हणून आज स्थान पटकावले आहे.
अनेक वर्षांपासून इफ्फीने चित्रपटांमधील उदयोन्मुख समकालीन प्रवाहांचा आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून समावेश केला आहे आणि तरूण चित्रपट दिग्दर्शक आणि सर्जनशील बुदधिमान व्यक्तींना त्यात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. इफ्फी 2022 बद्दल, ते म्हणाले की, यावर्षीही, प्रेक्षक आणि चित्रपट निर्माते विविध राष्ट्रांची संस्कृती, भाषा आणि वारसा यांची चित्रपटांच्या प्रिझममध्ये केलेल्या मिश्र रंगसंगतीचा अनुभव घेऊ शकतील. मला याची खात्री आहे की, इफ्फीची 53 वी आवृत्तीही सर्वांसाठी एक उत्साहवर्धक अनुभव असेल.
***
S.Patil/U.Kulkanri/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877091)
Visitor Counter : 180