सांस्कृतिक मंत्रालय
"भारत आणि डेन्मार्कमधील चांदीचा खजिना " प्रदर्शनासाठी भारताचे राष्ट्रीय संग्रहालय आणि डेन्मार्कचे कोल्डिंग संग्रहालय, यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी
Posted On:
17 NOV 2022 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2022
डेन्मार्क येथील कोल्डिंग संग्रहालय आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय मार्च 2023 च्या सुरुवातीला "डेन्मार्क आणि भारतातील चांदीचा खजिना" असे संयुक्त प्रदर्शन भरवणार आहे. राष्ट्रीय संग्रहालय आणि कोल्डिंग संग्रहालय यांच्यात आज नवी दिल्ली येथे प्रदर्शनाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
कोल्डिंग संग्रहालय आणि नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयातील उत्कृष्ट चांदीच्या कलाकृतींचा संग्रह मार्च 2023 मध्ये प्रदर्शित केला जाईल. भारत आणि डेन्मार्क यांच्यात 2022 ते 2026 या वर्षांसाठी नुकत्याच सहमती झालेल्या सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत हे सहकार्य आणि प्रदर्शन होत आहे.
"डेन्मार्क आणि भारतातील चांदीचा खजिना " हे प्रदर्शन डॅनिश आणि भारतीय चांदीच्या कलाकृतींवर केंद्रित आहे. या प्रदर्शनात दोन्ही संग्रहालये त्यांच्या संग्रहातील सर्वोत्तम चांदीच्या वस्तू मांडणार आहेत. दोन्ही देशांमधील चांदीच्या कारागिरीचे सौंदर्य आणि भव्यता दर्शवणाऱ्या या प्रदर्शनात एकूण 200 निवडक वस्तूंचे प्रदर्शन केले जाईल. या प्रदर्शनामुळे राष्ट्रीय संग्रहालयात पर्यटकांना भारतीय आणि डॅनिश चांदीच्या वस्तूंच्या समांतर परंपरा प्रथमच पाहता येणार आहेत.
याप्रसंगी डेन्मार्कचे भारतातील राजदूत एच.ई. फ्रेडी स्वेन म्हणाले, "नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय आणि कोल्डिंग संग्रहालय एकत्रितपणे चांदीचे प्रदर्शन भरवणार असल्याबद्दल आनंद वाटत आहे. ''
राष्ट्रीय संग्रहालयाच्या महासंचालक आणि संस्कृती मंत्रालयाच्या सहसचिव लिली पांडेय म्हणाल्या, “ राष्ट्रीय संग्रहालयात भारतीय संस्कृतीच्या सुरुवातीच्या कालखंडापासून ते आधुनिक युगापर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडातील चांदीच्या वस्तूंचा मोठा संग्रह आहे.''
(Ms Lily Pandeya, Director General National Museum and Joint Secretary, Ministry of Culture delivering her address on the occasion)
(H.E. Freddy Svane, Danish Ambassador to India delivering his address on the occasion )
(Mr. Rune Lundberg, Director of Museum Kolding delivering his address on the occasion)
S.Bedekar/S.Kakade /P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1876885)
Visitor Counter : 199