रसायन आणि खते मंत्रालय

भारतीय वैद्यकीय उपकरण क्षेत्राचे तीन दिवसीय राष्ट्रीय प्रदर्शन इंडिया मेडटेक एक्स्पो, 2023 (IMTE-2023) आता पुनर्निर्धारित वेळेनुसार 17-19 जानेवारी 2023 दरम्यान एरोसिटी ग्राउंड्स, नवी दिल्ली येथे होणार

Posted On: 17 NOV 2022 11:19AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2022

केंद्र सरकारने आयोजित केलेले इंडिया मेडटेक एक्स्पो,  (IMTE), हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच प्रदर्शन आता पुनर्निर्धारित वेळेनुसार 17-19 जानेवारी 2023 दरम्यान एरोसिटी ग्राउंड्स, नवी दिल्ली येथे होणार आहे. तीन दिवसांचे हे प्रदर्शन यापूर्वी 9 ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात बदल करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी, इंडिया मेडटेक एक्स्पो (IMTE) च्या संकेतस्थळाचे अनावरण   करण्यात आले आणि कार्यक्रमासाठी फ्लायर जारी करण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय वाणिज्य आणि  उद्योग महासंघ (फिक्की) चे सहकार्य लाभले आहे.

भारत सरकारच्या औषधनिर्माण  विभागाद्वारे, सर्व वैद्यकीय उपकरण उद्योग संघटनांच्या  सहकार्याने आयोजित केलेला इंडिया मेडटेक एक्स्पो IMTE) हा तीन दिवसीय कार्यक्रम असून इंडिया मेडटेक एक्स्पोची ही पहिलीच आवृत्ती आहे. "उपकरणांचे  भविष्य, निदान आणि डिजिटल" ही या प्रदर्शनाची  संकल्पना  आहे. या क्षेत्रातील सर्व हितसंबंधित म्हणजे उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेतील भागधारक, स्टार्ट अप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, अभिनव उद्योजक, संशोधन आणि विकास केंद्रं, इनक्यूबेटरस , सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालये, मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे , शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, गुंतवणूकदार, राज्य सरकारे, मेडटेक आणि या क्षेत्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रमुख सरकारी अधिकारी या सर्वाना एकत्र आणून सांघिक पातळीवर उत्कृष्ट  संधी निर्माण करणे आणि  या क्षेत्राच्या भारतातील वाढीसह  जागतिक स्तरावर त्याचे संभाव्य योगदान वाढवण्यासाठी  सहकार्य, हा या एक्स्पोचा उद्देश आहे.

इंडिया मेडटेक एक्स्पोला मेडटेक  उद्योगांकडून  मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे आणि या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवली आहे. आतापर्यंत,  सुमारे 150 हून अधिक  स्टार्ट-अप, 275 हून अधिक  भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय उपकरण कंपन्या आणि एम एस एम ई  युनिट्स, 50 पेक्षा जास्त  संशोधन संस्था इत्यादींनी एक्स्पोमध्ये त्यांचा सहभाग निश्चित केला आहे. 376 हून अधिक परदेशी खरेदीदारांच्या नोंदी प्राप्त झाल्या आहेत ज्यापैकी निवडक 200 हून अधिक परदेशी खरेदीदारांना थेट व्यवसायाशी  (Business-to-Business ) निगडित  घडामोडींमध्ये भाग घेता येईल.

IMTE-23 ,स्टार्ट अप्स, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय उपकरण कंपन्या, एम एस एम ई  युनिट्स आणि संशोधन संस्थांना भेटण्यासाठी आणि एकमेकांशी  संवाद साधण्यासाठी एक अनोखे  व्यासपीठ देईल प्रदान करेल.

नॅशनल मेडटेक एक्स्पो 2023 चे तपशील येथे उपलब्ध आहेत - http://www.indiamedtechexpo.in/

S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1876667) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil