माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी अबुधाबी येथे पहिल्या वर्ल्ड मीडिया काँग्रेसमध्ये केले मार्गदर्शन
Posted On:
16 NOV 2022 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022
भारतात मोबाइलचे 1 अब्ज 2 कोटी वापरकर्ते आहेत आणि 60 कोटी स्मार्ट फोनधारक असल्याची माहिती माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिली. संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबुधाबी येथे झालेल्या पहिल्या जागतिक प्रसारमाध्यम परिषदेत (वर्ल्ड मीडिया काँग्रेस) ते बोलत होते.
अत्यंत कमी डेटा दरांच्या स्मार्ट फोनमुळे मोठ्या प्रमाणात माहिती मिळविली जात आहे आणि मनोरंजनासाठीही हे मोबाइल फोन वापरले जात आहेत. समाजमाध्यमांमुळे आता भारतात माहिती जलद गतीने लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवितहानीही कमी झाली आहे, असे ते म्हणाले.
अशा प्रकारची पहिलीच परिषद आयोजित केल्याबद्दल त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अभिनंदन केले. भारत आणि यजमान देशामध्ये बरेच साम्य आहे.असेही त्यांनी सांगितले. त्यांनी उपस्थितांसमोर भारतातील प्रसारमाध्यमांच्या स्थितीचे चित्र उभे केले. एक परंपरागत प्रसारमाध्यम असलेला भारत हा देश आहे. भारतात 897 दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत, त्यापैकी 350 हून अधिक वृत्तवाहिन्या आहेत आणि 80 हजारांहून अधिक वृत्तपत्रे विविध भाषांमध्ये प्रकाशित होतात. अशी माहिती त्यांनी दिली. अलीकडे लोक नवीन माध्यमांकडे वळले आहेत आणि तरुण या नवीन माध्यमातील माहिती घेत आहेत, यामुळे विश्वासार्हतेचे आव्हान निर्माण झाले आहे आणि सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. या नव्या घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने उपाय शोधणे योग्य आहे आणि म्हणूनच भारताने स्वत:वर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आणली आहे. पहिल्या स्तरावरील तक्रारींचे निराकरण समाजमाध्यम संस्था पातळीवरच करण्याची ग्वाही ही यंत्रणा देते असे त्यांनी सांगितले.
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1876621)
Visitor Counter : 247