पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

शर्म अल शेख येथे कॉप-27 मध्ये भारताकडून “इन अवर लाईफटाईम” मोहिमेचा प्रारंभ

Posted On: 14 NOV 2022 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 नोव्‍हेंबर 2022

 

वर्ष 18 ते 23 वयोगटातील युवा वर्गाला शाश्वत जीवनशैलीचे संदेशप्रसारक बनण्यासाठी प्रेरित करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी(NMNH) आणि संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम (UNDP) यांनी संयुक्त रित्या “इन अवर लाईफटाईम” मोहीम सुरू केली आहे. शर्म अल शेख येथे सुरू असलेल्या कॉप 27 परिषदेत भारतीय दालनात एका कार्यक्रमात ही मोहीम सुरू करण्यात आली.

कॉप 27 मध्ये भारतीय दालनातील या कार्यक्रमात पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मार्गदर्शन केले. आजचा युवा वर्ग या कार्यक्रमाच्या हितधारकांपैकी एक आहे, असे ते म्हणाले. आपल्या वसुंधरेबाबत आपुलकी असलेले लोक निर्माण करण्यासाठी आपल्या पिढ्यांमध्ये जबाबदारीने संसाधनांचा वापर आणि जीवनशैलीच्या निवडीवर प्रभाव निर्माण करण्यासाठी  शाश्वत जीवनशैलीबाबत युवा पिढीमध्ये जागरुकता निर्माण करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. पर्यावरण सजग जीवन जगण्यासाठी उत्सुक असलेल्या जगभरातील युवा वर्गाकडून त्या संदर्भात नव्या कल्पना आणि विचार संकलित करण्याचे जागतिक आवाहन करणारे हे अभियान आहे. आपल्या क्षमतेनुसार पर्यावरणापूरक जीवनशैलीसाठी योगदान देणाऱ्या हवामानविषयक शाश्वत आणि अंमलबजावणीयोग्य उपाययोजनांबाबत त्यांच्या कल्पना पाठवण्यासाठी हे अभियान युवा वर्गाला प्रेरित करणार आहे. या कल्पना आदर्श पद्धती बनतील आणि त्यांचा जागतिक पातळीवर वापर सुरू होईल.

या अभियानाच्या सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा. 

For full text of the Minister’s speech click here

* * *

R.Aghor/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875977) Visitor Counter : 186


Read this release in: English , Urdu , Hindi