कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
जम्मू - काश्मीर आणि ईशान्येकडील प्रदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नेहमीच प्राधान्य क्षेत्र राहिले आहेत- केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
13 NOV 2022 10:47PM by PIB Mumbai
यापूर्वीच्या सरकारने डोंगराळ भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की,यापूर्वीच्या सरकारने डोंगराळ प्रदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदेशांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
असुरक्षित घोषित केलेल्या पूर्वीच्या पुलाच्या जागी नव्याने बांधलेल्या झुला बेली झुलत्या पुलावरून फेर फटका मारल्यानंतर तेथे झालेल्या एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते.
जितेंद्र सिंह म्हणाले,"धर्म, जात, पंथ किंवा पक्षाचा विचार न करता ज्यांना आमची गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांच्या गरजेनुसार प्रकल्प मार्गी लावण्याचे धोरण आम्ही अवलंबले आहे आणि येणाऱ्या अमृतकाळाच्या पुढील 25 वर्षांसाठी ज्यांची ऊर्जा राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणार आहे अशा तरुणांच्या लाभांसाठी इतर जणही अशा राजकीय संस्कृतीचेच अनुसरण करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्टार्टअप मोहिमेला चालना देण्यावर आमचा भर आहे असे सांगून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, "इथे, जिथे प्रचंड प्रमाणात संसाधने उपलब्ध आहेत आणि जी तरुणांसाठी उपजीविकेचे लाभदायी साधन ठरतील,अशा या ठिकाणी लवकरच शेतीशी संबंधित उद्योजकतेची सर्वसमावेशक योजना तयार केली जाईल."
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1875693)
Visitor Counter : 162