नागरी उड्डाण मंत्रालय
पुणे आणि बँकॉक दरम्यान थेट विमानसेवेचे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरार्दित्य सिंदिया यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
12 NOV 2022 10:33PM by PIB Mumbai
केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरार्दित्य एम. सिंदिया यांनी आज पुणे ते बँकॉक या थेट विमान सेवेचे उद्घाटन केले.
12 नोव्हेंबर 2022 म्हणजे आजपासून पुणे-बँकॉक-पुणे दरम्यान विमान सेवा सुरु होत आहे. या मार्गावर दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी विमान उड्डाणे होतील.
Flight No
|
Sector
|
Dep
|
Arr.
|
Frequency
|
Aircraft
|
SG 81
|
PNQ-BKK
|
18:45
|
00:40
|
Tue, Thu, Sat, Sun
|
B-737
|
SG 82
|
BKK-PNQ
|
14:15
|
17:10
|
Tue, Thu, Sat, Sun
|
B-737
|
पुणे आणि बँकॉक दरम्यानच्या या हवाई संपर्कामुळे व्यापार, शिक्षण आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारत आणि थायलंड या देशांमधील द्विपक्षीय देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळेल, असे ज्योतिरार्दित्य सिंदिया यांनी आपल्या भाषणात सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पुणे विमानतळ हे देशातील महत्त्वाचे विमानतळ असून या विमानतळावर पायाभूत सुविधा उभारण्याला सरकार चालना देत आहे. या विमानतळाचे नवीन टर्मिनल पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, तर नवीन आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनल (मालवाहतूक केंद्र) डिसेंबर 2024 पर्यंत विकसित होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत वापरासाठी एक एकीकृत एअर कार्गो टर्मिनल मार्च 2023 पर्यंत विकसित केले जाईल, अशी माहितीही सिंदिया यांनी यावेळी दिली. इथे बहु-स्तरीय वाहनतळ आधीच बांधून तयार असून ते लवकरच कार्यान्वित होतील असेही ते म्हणाले.

स्पाईसजेट कंपनीचे SG-81 हे विमान पुण्याहून संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण करेल आणि थायलंडच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे 12 वाजून 40 वाजता बँकॉक विमानतळावर उतरेल. तर SG-82 हे विमान बँकॉकहून थायलंडच्या प्रमाणवेळे नुसार दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी उड्डाण करून, पुण्यात संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. या मार्गावर बोईंग 737 विमान उड्डाणे करणार आहे.

***
S.Kane/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1875526)
Visitor Counter : 244