नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

IREDA च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल: करपूर्व नफा 76.16% नी वाढून झाला 276 कोटी 31 लाख रुपये


निव्वळ अनुत्पादीत मालमत्तेच्या प्रमाणात 4.87% वरून 2.72% इतकी घट

Posted On: 12 NOV 2022 6:24PM by PIB Mumbai

 

1)  करपूर्व नफा आणि करानंतरचा नफा अनुक्रमे 76.15% आणि 67.14% नी वाढून, अनुक्रमे 276 कोटी 31 लाख रुपये आणि  184 कोटी 30 लाख रुपयांपर्यंत पोहोचला

2)  एकूण उत्पन्न 15.90% नी वाढून 791 कोटी 56 लाख रुपये इतके झाले

3)  निव्वळ संपत्ती 69.16 % नी वाढून 5 हजार 638 कोटी 31 लाख रुपये इतकी झाली

4)  कर्ज नोंदणीचे प्रमाण 17.07 % नी आणि कर्ज मंजुरीचे प्रमाण 89.47 % नी वाढले

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय अपारंपरिक ऊर्जा विकास संस्था IREDA  या सार्वजनिक उपक्रमाने 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीच्या लेखापरीक्षणाचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. IREDA ने 2022-23 म्हणजेच चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीअखेर, 276 कोटी 31 लाख रुपये इतका करपूर्व नफा झाल्याचे घोषित केले आहे. हा नफा मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही अखेर मिळालेल्या 156 कोटी 86 लाख रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत 76.15 टक्क्यांनी जास्त आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही अखेर IREDA च्या निव्वळ अनुत्पादीत मालमत्तेचे –NPA चे प्रमाण 2.72 टक्क्यांपर्यंत  कमी झाले आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाही अखेर हे प्रमाण 4.87 टक्के इतके होते. या प्रमाणात 44 टक्के इतकी लक्षणीय घट झाली आहे.

2022-23 म्हणजेच चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीची, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ठळक वैशिष्ट्ये याप्रमाणे आहेत.

• करपूर्व नफा: गेल्या वर्षीच्या 156 कोटी 86 लाख रुपयांच्या तुलनेत, 276 कोटी 31 लाख रुपये (76.15 % नी जास्त)

• करानंतरचा नफा: गेल्या वर्षीच्या 110 कोटी 27 लाख रुपयांच्या तुलनेत 184 कोटी 30 लाख रुपये (67.14% नी जास्त)

• एकूण उत्पन्न: गेल्या वर्षीच्या 682 कोटी 94 लाख रुपयांच्या तुलनेत 791 कोटी 56 लाख रुपये (15.90% नी वाढ)

• निव्वळ  संपत्ती: गेल्या वर्षीच्या 3 हजार 333 कोटी 19 लाख रुपयांच्या तुलनेत, 5 हजार 638 कोटी 31 लाख रुपये  (69.16% नी जास्त)

• कर्ज नोंदणी (मागणी) ची एकूण रक्कम: गेल्या वर्षीच्या 28 हजार 856 कोटी 48 लाख रुपयांच्या तुलनेत 33 हजार 783 कोटी 36 लाख रुपये (17.07 % नी जास्त)

• कर्ज मंजुरीची एकूण रक्कम: गेल्या वर्षीच्या 5 हजार 925 कोटी 12 लाख रुपयांच्या तुलनेत 11 हजार 226 कोटी 49 लाख रुपये (89.47 % नी जास्त)

• निव्वळ अनुत्पादित मालमत्ता: गेल्या वर्षीच्या 4.87% च्या तुलनेत 2.72% (44.00% नी घट)

• एकूण अनुत्पादित मालमत्ता : गेल्या वर्षीच्या 8.05% च्या तुलनेत 5.06% (37.17% नी घट)

IREDA ने करपूर्व नफा आणि कर पश्चात नफ्यात नोंदवलेली अनुक्रमे 76.15% आणि 67.14% इतकी त्रैमासिक वाढ, तसेच एकूण आणि निव्वळ अनुत्पादित मालमत्तेमध्ये नोंदवलेली लक्षणीय घट म्हणजे, कोणत्याही बँकेतर वित्तीय संस्थेच्या दृष्टीने एक मोठे यश आहे, असे IREDA चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी अधोरेखित केले.

IREDA च्या सांघिक योगदानाशिवाय हे शक्य झाले नसते, असे ते म्हणाले. सातत्यपूर्ण परिश्रम आणि पाठबळाबद्दल त्यांनी IREDA च्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री  आर के सिंह, आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा तसेच रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी सातत्याने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि पाठिशी उभे राहिल्याबद्दल, दास यांनी त्यांचेही मनापासून आभार मानले. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आणि इतर अधिकारी, तसेच संचालक मंडळाकडून नेहमीच मिळत आलेल्या पाठबळाबद्दलही दास यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

***

M.Pange/A.Save/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875470) Visitor Counter : 143


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil