अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अमेरिका आर्थिक भागीदारीच्या नवव्या मंत्रिस्तरीय बैठकीमध्‍ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळाचा सहभाग

Posted On: 11 NOV 2022 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 नोव्‍हेंबर 2022

 

भारत-अमेरिका आर्थिक भागीदारीची नववी मंत्रीस्तरीय बैठक आज येथे पार पडली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन यांनी केले आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कोषागार मंत्री  डॉ. जेनेट येलेन यांनी केले.

भारतीय शिष्टमंडळात रिझर्व्‍ह बँकेचे गव्हर्नर, आर्थिक व्यवहार सचिव, मुख्य आर्थिक सल्लागार आणि वित्त मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे इतर प्रतिनिधी सहभागी झाले होते.  अमेरिकेच्या  शिष्टमंडळात फेडरलचे  अध्यक्ष, जेरोम पॉवेल (दूरदृश्‍य प्रणालीव्दारे), आंतरराष्ट्रीय घडामोडींचे कौन्सेलर ब्रेंट नायमन,  जय शामबाग,  आशियाचे उप सहाय्यक सचिव  रॉबर्ट कॅपरोथ, शाश्वत पायाभूत सुविधांसाठी कार्यालय उप संचालक  अॅमी झुकरमन, ट्रेझरीशी संबंधित भारतातील बिल ब्लॉक आणि अमेरिकेतील इतर प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते.

भारत- अमेरिका यांच्या दरम्यान झालेल्‍या ईएफपी म्‍हणजेच आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बैठकीत, विविध आर्थिक प्रश्‍नांवर,चर्चा झाली. यामध्‍ये स्‍थूल आर्थिक दृष्‍टीकोन,  हवामान वित्त, पुरवठा साखळी लवचिकता, आंतरराष्ट्रीय कर आकारणी, पैशाच्या अवैध  व्यवहाराविरोधात काम करणे, दहशतवादी कारवायांसाठी होणारा वित्तपुरवठा, भारताचे आगामी जी- 20 अध्यक्षपद आणि एमडीबी म्हणजेच बहुपक्षीय विकास बँक सुधारणा, यांच्‍यासह विविध आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

केंद्रीय अर्थमंत्री आणि अमेरिकेच्या कोषागार मंत्री यांनी संयुक्त निवेदनाचा  स्वीकार केल्यानंतर  बैठकीचा समारोप झाला.

या ईएफपी बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या शिष्टमंडळासमोर  भारताच्या डिजिटल नवोन्मेषी संकल्पनेचे  सादरीकरण केले.  सामान्‍य माणसाला मध्‍यवर्ती  ठेवून, सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी, तसेच  परिसंस्थेविषयी नवोन्मेषी संकल्पाना आणण्यासाठी, डिजिटल प्रगती अधिक घडवून आणण्‍यासाठी भारत आणि अमेरिका  यांच्यामध्‍ये सहकार्य करण्‍याच्या शक्यता तपासण्यात आल्या.  डिजिटल प्रगतीमुळे  व्यक्ती आणि लहान व्यवसायांना सक्षम होण्‍यास मदत मिळते. यावेळी एका  व्यावसायिक  कार्यक्रमाचेही   आयोजन  करण्यात आले होते.  त्‍यावेळी अर्थतज्ज्ञ उद्योग क्षेत्रातील नामवंत आणि ज्येष्‍ठ व्यावसायिक  उपस्थित होते.

संलग्न:

भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय  भागीदारीच्या नवव्या  बैठकीत तयार करण्‍यात आलेले संयुक्त निवेदन 

 

* * *

S.Patil/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1875378) Visitor Counter : 176


Read this release in: English , Urdu , Hindi