वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अमेरिका सी ई ओ मंचाच्या बैठकीचे आभासी पद्धतीने आयोजन; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जिना रायमोंडो यांनी संयुक्तपणे या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले


केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी या मंचावर भारत-अमेरिका आर्थिक नातेसंबंधांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीचा ठळक केला उल्लेख

भारत- अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध शाश्वतता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, जागतिक पातळीवर लवचिकता असणाऱ्या पुरवठा साखळ्या

आणि लहान उद्योग यांना प्रोत्साहन देण्यात असलेल्या सामायिक स्वारस्याने प्रेरित आहेत: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Posted On: 10 NOV 2022 10:29AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 10 नोव्हेंबर 2022


केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जिना रायमोंडो यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे आभासी पद्धतीने भारत-अमेरिका सी ई ओ मंचाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
भारत आणि अमेरिकेच्या सरकारांनी डिसेंबर 2014 मध्ये या मंचाची पुनर्स्थापना केल्यानंतरच्या काळात आयोजित करण्यात आलेली या मंचाची ही सहावी बैठक आहे. महत्त्वाच्या क्षेत्रातील संकल्पनावर चर्चा घडवून आणण्यासाठी तसेच दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना परस्परांतील अधिक सखोल सहकारी संबंधामुळे फायदा होईल अशी क्षेत्रे निश्चित करण्यासाठी एक परिणामकारक मंच म्हणून या बैठकांचा उपयोग होतो. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत संधू यांच्यासह अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी देखील या बैठकीत सहभागी झाले होते.

    
भारत तसेच अमेरिका या दोन्ही देशांतील प्रमुख कंपन्यांच्या सी ई ओं चा समावेश असलेल्या या अध्यक्षीय मंचाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाटा सन्स समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि लॉकहीड मार्टिन या अमेरिकी कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स टाईक्लेट यांच्याकडे आहे.
या बैठकीत बोलताना, भारत- अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध शाश्वतता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, जागतिक पातळीवर लवचिकता असणाऱ्या पुरवठा साखळ्या आणि लहान उद्योग यांना प्रोत्साहन देण्यात असलेल्या सामायिक स्वारस्याने प्रेरित आहेत या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अधिक भर दिला. या आर्थिक संबंधांमध्ये आणखी वाढ करण्याच्या दिशेने अशा चर्चात्मक बैठकांना असलेल्या महत्त्वाचा देखील त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.  
सह-अध्यक्ष पीयूष गोयल यांच्या बैठकीतील सहभागाबद्दल तसेच दोन्ही देशांदरम्यान असलेल्या द्विपक्षीय भागीदारीमध्ये अधिक वाढ करण्यासाठी ज्या सामायिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रीय केले पाहिजे त्यांच्याबाबतच्या विचारी मार्गदर्शनाबद्दल अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री रायमोंडो यांनी गोयल यांचे आभार मानले.
दोन्ही देशांच्या सरकारांनी लागू केलेल्या परिवर्तनीय सुधारणांबद्दल तसेच द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल दोन्ही देशांच्या कंपन्यांच्या अध्यक्षांनी त्यांची प्रशंसा केली.

विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अधिक सशक्त भागीदारी निर्माण करून विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्राधान्य क्रमाच्या क्षेत्रांची माहिती सात कार्यकारी गटांच्या अंतर्गत कार्यरत सी ई ओ नी या बैठकीत सादर केली त्यात उद्योजकता आणि लहान उद्योगांना प्रोत्साहन, आरोग्यसेवा आणि औषधनिर्मिती, अवकाश आणि संरक्षण क्षेत्र, माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान तसेच डिजिटल पायाभूत सुविधा, उर्जा, जल आणि पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्र, आर्थिक सेवा, व्यापार आणि गुंतवणूक यांसह इतर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश  आहे. 


पुढच्या वर्षी होणार असलेल्या भारत-अमेरिका सी ई ओ मंचाच्या आगामी  बैठकीत विशिष्ट शिफारसी करण्यासाठीचा आराखडा म्हणून आजच्या बैठकीतील चर्चा महत्त्वाची ठरणार आहे.

 


***

Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1874928) Visitor Counter : 196


Read this release in: Hindi , English , Urdu , Tamil , Telugu